जमिनीचा कस म्हणजे काय?
जमिनीत ह्युमसचे म्हणजे आँरगँनिक कार्बनचे व पोषक द्रव्यांची माती सोबतअसलेले प्रमाण म्हणजे कस. सेंद्रीय कर्बाची पातळी भरून काढण्यासाठी हिरवळीचे खते, जिवाणू संवर्धक जिवामृताचा वापर,शेनखत वापरतो पण आपल्या जसे पाहीजेत तसे परीनाम मिळत नाही यांचे कारण काय असेल आता थोडं लक्षात घेऊ आपल्या मागच्या पिढिने आपल्याला शेती सुपिक व उपजाऊ ही भेट केली होती कर्बाचे प्रमाण हि वाढल होत
त्या नंतर अचानक हरीत कांती ची चाहूल लागली आपन उत्पादन तर भरपुर घेतले पण विसरलो की शेतीला काय पाहीजे व कश्याची गरज आहे.मग रासायनिक औषधांचा व खताचा वापर वाढत गेला व शेती ला उतरती कळा लागली चुक आपली व दोष दिला मात्र शेती ला वारंवार तिचं पेरणी पद्धती व एकसारखे पिकं घेतली व मात्र शेती ला उपाशी ठेवले.
वातावरणात अचानक होनारे बदल , रासायनिक खते व औषधे यांना प्रभावी पर्याय नसल्याने त्यांचा होनारा भरमसाट वापर त्यामुळे जमीन व पाणी विषाक्त बनली आहे.आजच्या दिवसांत पिकावरील नवं नवीन रोग व तनांंचा बंदोबस्त न होने , भरपूर खते टाकूनही ती लागु न पडणे परिणामी पिके रोगराई मुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे हताश व निराश झालेला आहे.
मंडळी हे कशामुळे घडते आहे माहीत आहे का ?
तर याचे मुख्य कारण म्हणजे शुद्ध गावरान भाषेत जमिनीचा किंवा मातीचा कस कमी झाला आहे.
शेणखत तर सोडाच साधे आपन शेतातला काडीकचरा सुद्धा जाळला.शेताला उन्हाळ्यात उनाची आवश्यक असते ही देत नाही.आता आपल्याला शेती च योग्य नियोजन करावे आरोग्यावरच माणसांसह सर्व पशूंचे आरोग्य अवलंबून असते, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. मृदेमध्ये काय असते? मृदेमध्ये काहि घटक संतुलित प्रमाणात असताना कृषी उत्पादनात वाढ व सातत्य मिळते. गेल्या काही वर्षांत सातत्याने झालेल्या चुकांमुळे मूलभूत घटकांचे असंतुलन झाले आहे. त्याला मृदेची धूप आणि सेंद्रिय पदार्थांचे घटते प्रमाण कारणीभूत आहे.
सेंद्रिय पदार्थांच्या कमी होणाऱ्या प्रमाणामुळे त्यावर अवलंबून सूक्ष्मजीवांचे जिवाणू, बुरशी व इतर सूक्ष्म सजीव घटक व गांडुळासारख्या कृमींचे प्रमाण कमी होते. हे सारे घटक जमिनीला जिवंत करतानाच पिकांच्या वाढीसाठी मदत करत असतात. जमिनीतील खनिज पदार्थांमुळे गुणधर्म प्राप्त होतात. लागेल.शेतिला जर बळकट करायच असेल तर कंपोस्ट खताचा वापर व शेणखताचा वापर वाढवावा लागेल . जिवाणू संवर्धक वापरावे लागेल
Share your comments