1. कृषीपीडिया

शेतीतील समस्यांना अशाप्रकारे जा सामोरे, समाधान मिळेल

आजचा विषय थोडा विचार करून शेती करण्या सारखा आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतीतील समस्यांना अशाप्रकारे जा सामोरे, समाधान मिळेल

शेतीतील समस्यांना अशाप्रकारे जा सामोरे, समाधान मिळेल

आजचा विषय थोडा विचार करून शेती करण्या सारखा आहे. शेती मधे समस्या निर्माण होतात त्या समस्येला तोंड द्यावे लागते जसे की आमची विदर्भामधली ली कोरडवाहू शेती आता फक्त विषय समजून घ्याा! शेती ही शेतीसारखीच करायची असते हे विधान आमच्या विदर्भात लागु नाही कारण येथील शेती ही सर्वथा निसर्गावर अवलंबून आहे कारण कोरडवाहू शेती व त्या मधे खारपानपट्टा केव्हा केव्हा तर खरीप हंगामात पेरणी झाल्यावर पाऊस दांडी मारतो.मातीच्या कुशीत कुबेरलेल बियाणे पावसाच्या आकांताने मृतावस्थेत जाते.पुन्हा दुबार पेरणी च संकट मग त्या शेतकर्याला असते पैशाची गरज पुन्हा सावकाराच्या दारात कारण क्षेत्र आहे कोरडवाहू पिके आले तर आले नाही तर सर्व काम करुन सुद्धा उपाशी विदर्भात सिंचन प्रकल्प बोटावर मोजण्या इतके कोठे कोठे तर रखडलं काम एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे ते म्हणजे शेती ला कोणताच जोड व्यवसाय नाही.

कारण दुग्ध व्यवसाय म्हटले तर चारा अभाव सर्व पंचरंगी कार्यक्रम आहे जमिन पाणी वातावरण हे एक सारखे नाही त्या मधे सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून ओळख झालेल्या विदर्भातील शेतकरीआहे त्याचे कारण निसर्गाचा प्रकोप, पावसाची हुलकवणी, रोगांचा प्रादुर्भाव आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर या दुष्टचक्रात शेतकरी फार सापडला आहे आपल्या भागाची ओळख असलेल्या पीक कापूस लागवडी खालील क्षेत्र सर्वाधिक असतानाही सर्वात कमी उत्पादकता एकट्या विदर्भात आहे. कापूस उत्पादकांप्रमाणे संत्रा आणि भात उत्पादकांचेही हाल सुरू आहेत. वातावरणात वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे संत्री, आंब्याचा दुबार मोहोर व फळांची गळती त्याच धान उत्पादक शेतकरी यांनाआर्थिक फटका बसल्याने फार कोलमडून पडत आहे. विदर्भामध्ये नैसगिक साधनसंपत्ती पुरेपुर असून देखील राजकीय मानसिकता, शेतक-यांची सामाजिक आणि आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, 

सिंचनाच्या अपु-या सोयीसुविधा यासर्व गोष्टीमुळे शेतीच्या उत्पादनात व येथील शेतक-यांच्या विकासात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विदर्भातील शेतक-यांच्या विकासावर राजकीय व संशोधनिक गांभीर्य वेळीच निर्माण होणे गरजेचे आहे, अन्यथा येथील शेतकरी अधिक काळोखात गुरफटत राहील व परिस्थितीची फक्त चर्चा करण्याशिवाय आपल्या हाती काहीच राहणार नाही.ज्यामुळे येथील उत्पादन देखील पावसासारखे देवावर अवलंबून आहे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ.

आपल्याला सर्वांना माहीत असेल की विदर्भातील एकमेव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सुध्दा या सर्व गोष्टीवर अभ्यास व संशोधन चालू आहे. तरीही दुर्दैवाने विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती काही बदलण्याची नाव नाही घेत आहे. कारण या सर्व गोष्टी साठी आपला शेतकरी वर्ग जागरुक करणे आवश्यक आहे.काही नविन तंत्रज्ञान कृषी विद्यापीठ मार्फत शेतक-यांपर्यंत पोहचायला पाहिजे. 

तरी मला असे वाटत त्या प्रमाणात पोहचू शकले नाही वर्हाडातला शेतकरी राजा या सर्व गोष्टी पासून वंचित राहीला कुठल्याही गोष्टीची नवीन करण्याचे धाडस करत नाही धाडस केले तर शेतकरी एकमेकांबरोबर एकत्र येऊन चर्चा करत नाहीत. तसेच, एकजूटीने नवीन योजना. त्यामुळेच विदर्भाची परिस्थिती जशीच्या तशीच राहत आहे.आता एकच ध्यास धरावा कि आपण सुध्दा जागृत होण्याची गरज आहे.निट समजून घेणे आवश्यक आहे. या नवनवीन शेतीवरील संशोधनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा आणि नवनविन योजना नवीन तंत्र विकसित करणे आवश्यक आहे चला तर आपणही या सर्वांचा फायदा घेऊ, शेती मधे सोनं पिकवू आणि सधन बनवू स्वत:ला व महाराष्ट्राला बलशाली बनण्याचे ध्येय गाठुया! आपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण करुया विसरु नका याच विदर्भाच्या मातीतुन पहिला कृषी मंत्री दिला, याच मातीने हरित क्रांतीचा जनक दिला आहे, त्याच माती तुन झिरो बजेट नैसर्गिक शेती ची संकल्पना मांडणारा दिला आपन त्यांच्याच स्वप्न साकारण्यासाठी चला आपल्याला संकटाने पछाडण्या आधी आपण संकटांला पछाडू.

 

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

Mission agriculture soil information

9423361185

English Summary: Farming problems do also face will satisfy Published on: 22 March 2022, 02:40 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters