शेती कर्ज हा शेती व्यवसायातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत शेती कर्जाचे प्रकार तसेच कर्ज परतफेडीचे हप्ते याविषयीची माहिती. शेती कर्जाचे बरेच प्रकार येतात परंतु त्याच्या वापरावरून किंवा त्याच्या हेतू वरून कर्जाचे प्रकार पडतात. सुरुवातीला दोन प्रकार पाहूया तिसरा प्रकार शेवटी थोडक्यात पाहू.
१. Working Capital / पीक कर्ज २. Term Loan / मुदत कर्ज ३. माल तारण कर्ज
1) पीक कर्ज: जे प्रत्येक वर्षी खर्च येतात त्याला पीक कर्ज म्हटले जाते. ज्यामध्ये बी-बियाणे, आंतरमशागती,
खते व औषधे किंवा लेबर खर्च असेल यांचा खर्च ज्या कर्जा मध्ये येतो त्याला पिक कर्ज म्हणून ओळखला जाते. जमिनीच्या मशागतीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंतचा जेवढा खर्च येतो तो खर्च या कर्ज मध्ये येतो.
याची खासीयत अशी असते की हे पीक कर्ज तुम्ही वर्षातून कितीही वेळा भरू शकता आणि कितीही वेळा काढू शकता. म्हणजे बँकेने तुम्हाला ठराविक मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये तुम्हाला हे पीक कर्ज भरायचे तर आहेच परंतु त्याच्या आधे मधे तुमच्याकडे काही पैसे आले तर तुम्ही ते पीक कर्ज मध्ये भरून ठेवू शकता.
तुम्ही जेवढे पैसे पिक कर्ज मध्ये भरून ठेवले तर तेवढंच व्याज तुमचं वाचत आणि गरज पडेल त्या वेळेस काढू शकता असं तुम्ही वर्षातून किती वेळा करू शकतात. या कर्जाची मुदत साधारण एक वर्ष ते तीन वर्षे किंवा पाच वर्षे ही असू शकते
2) Term loan / मुदत कर्ज : एखादा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी किंवा शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी जे कर्ज काढले जाते त्याला मुदत कर्ज असं म्हटलं जातं. उदा. पाईप लाईन, पोल्ट्री, गाई खरेदी, ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा शेती अवजारे खरेदी करायचे असतील त्यांच्यासाठी जे कर्ज घेतले जाते ते मुदत कर्ज म्हणून मिळत असते.
याची खर्चाची जी गरज असते ती फक्त सुरुवातीलाच असते. याच्यामध्ये मात्र एकदा भरलेले पैसे तुम्हाला काढता येत नाहीत. याची मुदत साधारणत तीन वर्षे ते सात वर्षे असू शकते. हे तुम्ही कुठलं कर्ज काढले आहे आणि तुमची पीक पद्धती वर अवलंबून असते.
हप्ते कसे असतात : 1)पीक कर्ज : पीक पद्धतीनुसार साधारणत सहा महिने किंवा एक वर्षातून एकदा नव-जुने करणे
किंवा फिरवून घेणे गरजेचे असते. याची परतफेड पाच वर्षे असते. म्हणजे प्रत्येक वर्षी नव-जुने करायचे असे 5 वर्ष करायचे पण 5 वर्षाने मात्र तुम्हाला नव्याने कर्ज करावे लागते.
2) मुदत कर्ज : त्याची मुदत साधारण 3 वर्ष, 5 वर्षे किंवा 7 वर्षांत असू शकते. याचे हप्ते किंवा मुदत हे तुमचे उत्पादन चक्रानुसार असते आणि उत्पादन चक्रानुसार तुम्हाला समान हप्ते पाडून दिलेले असतात.
3): Pledge Loan / माल तारण कर्ज : मका, बेदाणा, काजु सोयाबीन यांसारखी पिके तुम्ही बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावर ती कर्ज घेऊ शकता.
Share your comments