राज्यात यंदा चांगला पाऊस पडेल असे सांगितले जात असताना पावसाने मात्र ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी (Agricultural Department ) कृषी विभाग तर राबत आहेच शिवाय ज्यांनी शेती क्षेत्रात अनोखे प्रयोग केले आहेत त्यांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक परस्थितीतुन बाहेर वाढणे हाच यामागचा उद्देश आहे.
यामध्ये बिजमाता पद्मश्री (Rahibai Popare) राहिबाई पोपरे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे त्यांनी काय मत व्यक्त केले आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धा येथील दत्ता मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत बी-बियाणांचे वाटप झाले आहे. या दरम्यान, पद्मश्री राहिबाई पोपरे यांना शेतकऱ्यांना दिलेला संदेश उत्पादनवाढीसाठी लाखमोलाचा ठरणार आहे.
यावेळी राहिबाई पोपरे म्हणाल्या की, परीश्रमाला कोणी तयार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शरीरासारखीच आपल्या जमिनीची काळजी घेतल्यास तिची पोत सुधारेल. काळ्या आईची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढेच उत्पन्न वाढणार आहे. शेती हा बांधावरुन करण्याचा विषय राहिलेला नाही. ज्याचे हात राबतात त्याला यश आहेच. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा समजून आणि बाजारपेठेचा अभ्यास करुन त्याला परिश्रमाची जोड दिली तर बळीराजा हा राजाच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ
तसेच त्या म्हणाल्या की, देशाचा पुरस्कार मला मिळाला असला तरी तो काळ्या आईची सेवा केल्यामुळेच. शिवाय अजूनही माझे कार्य हे सुरु असल्याचे सांगत राहिबाई यांनी रासायनिक खताला योग्य पर्याय मिळणेही गरेजेचे असल्याचे सांगितले. सध्या उत्पादनात वाढ झाली असली तरी उत्पादनाची पध्दतीही बदलणे गरजेचे आहे. सध्या शेतकरी हे रासायनिक खताचा मारा करुन उत्पादन वाढवतात, यामुळे फायदा होत असला तरी ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.
'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'
त्यामुळे शेणखत व जैविक खताचा उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच यावर्षी पावसाचा अंदाज घेऊन त्यांनी पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे, यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या पावसाने चांगलीच ओढ दिल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत. यामुळे आता पुढील महिन्यात तरी पाऊस पडणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
दारू पिल्यावर तो व्यक्ती इंग्रजी संभाषण का करतो, जाणून घ्या खरे कारण..
मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..
काय सांगता! स्वत:च्या लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही..
Share your comments