आजच्या काळातआपली शेती आता वातावरणाची निगडित करावी लागेल.वातावरणातील बदलांचा शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.जसे अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड काही मुदतीचे खंड, अतिप्रखर अगर अतिशीत सुर्य प्रकाशाचे किरण वगैरें चा पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन शेतीचे उत्पन्न घटण्याची शक्यता असते. एकसारखा पाऊस ह्यांचाही विचार करावा लागतो कारण त्यांचा परिणाम शेतीची मशागत, बी रूजणे, पिकांची गाढ, त्यांवर पडणारी कीड व त्यांना होणारे रोग आणि शेवटी शेतीचे उत्पन्न ह्या सर्वांवर होतो.
एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साठते, गवत उगवते व त्यामुळे मशागत करता येत नाही. पेरणी झाल्याबरोबर अतिवृष्टी झाली, तर पेरलेले बी वाहून जाते अगर जमिनीत कुजते. सतत पाऊस पडत असताना आभाळ मेघाच्छादित राहिल्यामुळे पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, ती पिवळी पडतात व खुरटतात. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे व तापमान कमी झाल्यामुळे पिकांवर कीड पडते व ती रोगग्रस्त होतात हवामानाचा शेतीच्या मशागतीवरही परिणाम होतो. अतिवृष्टीमुळे शेतांची किंवा पिकांची मशागत करता येत नाही.शेती व माती चे ही बदलत्या वातावरणामुळे आपल्याला शेती तंत्र मध्ये बदल करावा लागेल.खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पिक उत्पादन या मधे बदल करावा लागेल.कोरडवाहू शेती फारदेशीर बनविण्यासाठी आंतरपीक पध्द्तीचा अवलंब आवश्यक आहे.तसे सोयाबीन तूर ,मुग तुर,
होणारा पावसाचा लहरीपणा लक्षात घेता जे सरासरीपेक्षा कमी पेक्षा किंवा जास्त पाऊस झाला.
तरी आंतरपिक पद्धतीमुळे शेतकर्रास हमखास उत्पन्न हाती घेण्याची हमी असते.खरिपाच्या पिकाला अवर्षणाचा फटका बसतो, तर रब्बीच्या पिकाने नुकसान भरून काढावे तर तेव्हा अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करून जातो.
वातावरणातील अनेक बदल शेतीवर थेट परिणाम करणारे आहेत. सरासरी तापमानातील वाढ हा पहिला बदल होय.
वातावरणातील नेहमी होत असलेल्या बदलांमुळे हा पर्जन्यकाळ १० ते १५ फरक दिवसांनी पुढे जात आहे. गेल्या वर्षी हा बदल आपण अनुभवत आहे हे नक्की. पर्जन्यकाळ पुढे वाढल्यामुळे जानेवारीत संपणारी थंडी फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल. मात्र, हीच परिस्थिती पुढेही कायम राहील असे ही नाही
बदलत्या हवामानाला सुसंगत पद्धतीने शेतकर्यांनीही जलदगतीने बदलणे गरजेचे आहे. नुकसान टाळण्यासाठी पीक लागवडीचा प्रचलित कालावधी वा तारखा बदलणे किंवा विविध पीकवाणांचा अवलंब करणे गरजेचे आहे.हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी बदलत्या हवामानाचा पुर्व अनुमान काढुन वेळीच योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्यामुळे परिणामाची दाहकता कमी करता येईल.
वेगवेगळ्या पिकांचा कालावधी ठरविणे आवश्यक आहे. तसेच पावसास सुरुवात कधी होते, पावसाची उघडीप कधी होते, पडणारा पाऊस हा किती व काय तीव्रतेने पडतो, पाऊस पडण्याची शक्यता कधी व किती आहे याचा अंदाज करण्यासाठी मागील काही वर्षांच्या पावसाळ्याचे विश्लेषण त्या त्या भागातील करणे आवश्यक आहे. तसेच पावसात खंड नेमका कधी पडतो, पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कधी आहे याचीही माहिती आपणांस हवी .शेतीच्या नियोजनामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नासाठी वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता फार महत्त्वाची असते .पेरणी , आंतरमशागत , खतांची मात्रा , वेळेवर औषधांची फवारणी , पिकाच्या गरजेच्या वेळी संरक्षित पाणी देणे , पिकांची काढणी योग्य वेळी करणे ह्या सर्व गोष्टींचे नियोजन करणे महत्वाचे ठरते.
Share your comments