सातारा जिल्ह्यात असलेले कराड येथील मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचे लोकार्पण सहकार आणि पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रविण ताटे, जयंत पाटील, वसंत पाटील, दयानंद पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी गती दिली.
यंत्राची ५ मेट्रीक टन प्रति तासाची क्षमता
कराड परिसरात शेतकरी वर्ग ऊसाच्या उत्पन्नावर जास्त भर देत असला तरी बदलत्या काळानुसार शेतकरी आता सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा अशा पिकांकडे वळला आहे. मात्र शेतकऱ्याने घेतलेल्या उत्पादनात कचरा, खडे असल्याने या मालाला कमी भाव दिला जातो.
यासंदर्भात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गरज पहाता ५ मेट्रीक टन प्रति तासाची क्षमता असलेले धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असून या यंत्रणेचा शेतकरी व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.
धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा काय ?
शेतमालामध्ये काडीकचरा, दगड, इ. नसल्यास अशा शेतमालास ग्राहकही जादा भाव देऊन खरेदी करण्यास उत्सुक असतात. तथापि, शेतामध्ये निघालेला माल हा स्वच्छ, काडीकचरा, खडे, माती विर हित नसतो. त्यामूळे शेतक यास कमी भाव मिळतो. शेतकरी स्वत: उत्पादित करित असलेल्या शेतमालासाठी धान्य चाळणी यंत्रासारखी यंत्रसामुग्री शेतावर उभी करु शकत नाही, तसेच त्यास हे आार्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही.
शेतमाल स्वच्छ करुन ग्राहकांना दिल्यास शेतमालास जादा बाजारभाव प्राप्त होऊ शकेल. या दृष्टीने शेतक याच्या शेतमालास जास्त रक्कम मिळून देण्यासाठी बाजार समित्यांनी बाजार आवारामध्ये धान्य चाळणी यंत्र बसविणे अत्यंत आवश्यक आहे.
बाजार समित्या धान्य चाळणी यंत्र बस विण्यासाठी प्रोत्साहीत व्हाव्यात, यादृष्टीने धान्य चाळणी यंत्रासाठी अनुदान देण्याचा निर्णय कृषि पणन मंडळाने घेतला आहे. धान्य चाळणी यंत्रासाठी धान्यचाळणी यंत्राच्या एकूण किंमतीच्या 10 टक्के किंवा रु. 2/- लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम बाजार समितीस अनुदान म्हणून देण्यात येते.
वखार महामंडळाची तब्बल १ हजार १९० गोदामे
तसेच यावेळी पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना १९५७ मध्ये झाली असून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रगतीपथावर आणण्यास हातभार लावला. महराष्ट्र राज्य वखार महामंडळाची तब्बल १ हजार १९० गोदामे आहेत. तर पनवेल व सांगोला याठिकाणी शितगृहे आहेत. या सर्व गोदामांची साठवणूक क्षमता २१.८३ लाख मे. टन इतकी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना राखीव जागा देखील उपलब्ध करुन दिली जाते. या मालाची शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करून शंभर टक्के विमा संरक्षणाबरोबर ७५ टक्क्यांपर्यंत अल्पदराने त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Share your comments