प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojna) योजनेतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य कृषी विभागातर्फे एक नवा उपक्रम राबविला जाणार आहे. या योजनेतून मिळणारा हप्ता बँकेत जमा होण्यासाठी फक्त बँकचे खाते (Bank Account) ग्राह्य धरले जायचे मात्र आता राज्य कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही आधार क्रमांकाशी जोडण्यात आली आहे. यामुळे बँक खातेक्रमांकाची गरज नसून हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
राज्य कृषी विभागाच्या या नव्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोय दूर होतील. या उपक्रमाची अंमलबजावणी येणाऱ्या हप्त्यापासून होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, फायदा काय? पहा सविस्तर.
PM Kisan Yojna| प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक साहाय्य केली जाते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनातर्फे गावपातळीवर कॅम्पचे आयोजन जाणार आहेत.
राज्यातील कृषी विभागाच्या (agriculture department) या निर्णयामुळे तब्बल 6 लाख शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.
म्हणून शेतकऱ्यांना मिळत नव्हता लाभ
या योजनेतील हप्त्याचे पैसे बँक खात्यावर जमा झाले की नाही याची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या खूप फेऱ्या कराव्या लागायच्या. तसेच
बँकेकडून अनेक कारणे सांगून हप्ता रक्कम ही जमा केली जात नव्हती. जस की, आयएफसी कोड बदलला,
बँकेचे सर्व्हर डाऊन झाले, बँक खाते अॅक्टीव नाही, इतकंच नाही तर बँक खाते बंद झाले अशी देखील कारणे शेतकऱ्यांना सांगितली जात होती. बँकेच्या अशा ताणामुळे तब्बल 6 लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता.
आगामी हप्त्यापासून अंमलबजावणी
राज्य कृषी विभागाने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी 11 वा हप्ता जमा करण्यापूर्वी केला जाणार आहे. यासंबंधीच्या सूचना आता ‘एनआयसी’ ला देण्यात आल्या आहेत.
Share your comments