कांद्याचे उत्पादन किती निघाले आहे त्यापेक्षा कांद्याची साठवणूक व दरात झालेली वाढ आणि विक्री करणे हीच कांद्याची महत्वाची सूत्रे आहेत. सध्या ऊन वाढतच चालले असल्यामुळे उन्हाळी कांदा टिकत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची काढणी केली की लगेच छाटणी करून बाजारात विक्री करण्यास घेऊन जातात. मात्र या समस्येवर घोडेगावच्या माऊली या शेतकऱ्याने पर्याय काढलेला आहे. अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी कांदा टिकून राहत नसल्यामुळे विक्री करतात मात्र या शेतकऱ्याने अशा बियाणांचा शोध घेतला आहे ज्याचा कांदा टिकून राहील. माऊली ने अनेक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी तसेच केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास केला आहे. केव्हीके मधील भीमा शक्ती हे बियानेच उत्पादन वाढीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कांद्याची काढणी झाल्यानंतर हा कांदा आपण आठ ते नऊ महिने साठवून ठेऊ शकतो. असे माऊली सांगतात.
साठवणूकीचा असा हा फायदा :-
कांदा दरामध्ये चढ उतार हा ठरलेला असतो जे की मागील महिन्यात कांद्याला ३ हजार रुओए दर होता तर आजच्या स्थितीला चांगला प्रतीच्या कांद्याला १ हजार रुपये तर सर्वसाधारण कांद्याला ८०० रुपये दर भेटत आहे. एवढा खालचा दर भेटून सुद्धा शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे कारण कांदा हे नाशवंत पीक आहे. तसेच निसर्गाचा लहरीपणामुळे पिकाला धोका निर्माण होत असल्याने उत्पादनात घट होते त्यामुळे दाथवलेला जो कांदा असतो त्याचा दर्जा व्यवस्थित राहत नाही.
भीम शक्ती’ वाणाचे काय आहे वेगळेपण :-
सर्वसाधारण कांदा हा २-३ महिने टिकून राहतो मात्र अशा परिस्थितीत जर कांद्याचे भाव वर खाली होईल लागले की शेतकऱ्यांना कांदा विक्री केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. उत्पादनाकडे लक्ष न देता उत्पादित झालेल्या कांद्याचे योग्य नियोजन लावावे लागते. भीमशक्ती वाणाचा कांदा ८ ते ९ महिने बाजारात टिकून राहतो. शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला की तो कांदा बाहेर काढतो.
एकरी 10 लाखाच्या उत्पादनाचे उद्दीष्ट :-
कांदा हे ४ महिन्याचे पीक आहे. माऊली या शेतकऱ्याने KVK मधून आणले असून ते पाच एकर साठी त्यांना २ लाख २५ हजार रुपये खर्च आलेला आहे. तर त्यास ठिबक आणि मजुरीसाठी २ लाख रुपये खर्च आला. एकरी १० लाख रुपये चे उत्पन्न त्यांनी निश्चित केले आहे. शेतात नवीन बियाणांचा वापर करून चांगले उत्पन्न भेटते असे माउलींनी सांगितले आहे.शेतकऱ्याचा नादच खुळा! भीम शक्ती वाणाच्या बियाणांचा वापर करून एकरात काढले चौपट कांद्याचे उत्पन्न
Share your comments