1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो जवस लागवडीसाठी सुधारित जातीचा वापर करा, जाणून घ्या..

जवस हे महत्वाचे तेलबिया पीक (Oilseed crop) आहे. या शेतीचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी केला जातो. या पिकामध्ये 8 प्रकारची जीवनसत्त्वे खनिजे आहेत. यासह जवस हे अतिशय पौष्टिक मानले जाते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
varieties for linseed cultivation

varieties for linseed cultivation

जवस हे महत्वाचे तेलबिया पीक (Oilseed crop) आहे. या शेतीचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी केला जातो. या पिकामध्ये 8 प्रकारची जीवनसत्त्वे खनिजे आहेत. यासह जवस हे अतिशय पौष्टिक मानले जाते.

जवसाच्या तेलामध्ये ५८ % ओमेगा-३, ओमेगा-६, कोलेस्ट्रेरॉलल आणि अँटिऑक्सिडंट आहेत. जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २०% खाद्यतेल म्हणून, तर ८०% तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी वापर होतो. यासह जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक देखील मानला जातो. दुहेरी फायदा होऊ शकतो. 

जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधवड्यात करावी. दोन ओळींतील ३० सेंमी किंवा ४५ से.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सेंमीपेक्षा अधिक खोल करू नये.

अधिक उत्पादनासाठी रोपांची संख्या प्रति हेक्टरी ४.५ ते ५ लाख असावी. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी ८ ते १० किलो प्रति हेक्टरी वापरा.

कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, होईल फायदा, जाणून घ्या...

शारदा : कोरडवाहूसाठी उत्तम आहे. १००- १०५ दिवस कालावधी, ४१ % तेलाचे प्रमाण असते. उत्पादन ८०० किलो/ हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम (Insect resistant) आहे.

एन.एल-९७ : ११५- १२० दिवस कालावधी, ४२ % तेलाचे प्रमाण असते, तसेच उत्पादन ६००-१२०० किलो/हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस ही जवसाची जात प्रतिकारकक्षम आहे.

एन.एल-२६० : १११-११५ दिवस कालावधी, ४३ % तेलाचे प्रमाण असते. उत्पादन १५००-१६०० किलो/हेक्टर मिळते. मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस ही जात प्रतिकारकक्षम आहे.

सिताफळ देईल बंपर उत्पादन, करा फक्त 'असे' नियोजन
शेतकऱ्यांनो कांदा बीजोत्पादन व्यवस्थापन, जाणून घ्या
७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध, 'या' म्हशीच्या जाती ठरत आहेत फायदेशीर

English Summary: Farmers should use improved varieties for linseed cultivation, know.. Published on: 21 April 2023, 01:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters