1. कृषीपीडिया

बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी

बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच, कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले

बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे.

खरेदी करावयाच्या बियाणे वाण/जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का, हे जाणून घ्यावे. निवडलेला वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील आहे का, याची माहिती घ्यावी. निवडलेला वाण किती कालावधीचा आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती

भाजीपाला बियाण्याच्या बाबतीत तो वाण कोणत्या हंगामासाठी शिफारस केलेला आहे व कोणत्या कालावधीपर्यंत लागवड करायचा, हे जाणून घ्यावे. शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर लागवड करू नये.

वाणाची निवड करताना जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचे अंतर, कोरडवाहू / बागायत यांचा विचार करावा. वाणाची निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कृषि विद्यापीठाच्या शिफारसीनुसार एकरी लागणारे बियाणे यांची माहिती

खासगी क्षेत्रातील संशोधित केलेले टूथफुल (सत्यतादर्शक) बियाणे निवडायचे असेल, तर एकच वाण सर्व क्षेत्रासाठी न निवडता क्षेत्राप्रमाणे दोन-तीन वाण निवडावेत. या वाणांचा लागवडीनंतर चांगला अभ्यास अधिक उत्पादनाचे प्रलोभन कुणी दाखविल्यास ते वाण अपरििचत असतील, तर निवड करू नये. यातून फसगत होऊ शकते. अशा अपरिचित जातीपासून नवीन कोड व रोगांचा आपल्याकडे शिरकाव होऊ शकतो.

खरेदी केलेल्या बियाण्याची विक्रेत्याकडून पकी पावती घ्यावी. या अंतिम तारीख, शेतक-याचे नाव, पूर्ण पत्ता इ. स्पष्ट लिहावे. पावतीवर विक्रेत्याची व शेतक-याची सही असणे आवश्यक आहे.बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमती पेक्षादुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा आहे.

 प्रमाणित (सर्टिफाईड) बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूंनी आतून शिवलेली असते. वरच्या बाजूने प्रमाणपत्र शिवलेले असते व त्याला सील लावलेले असते. अलीकडे प्लॅस्टिक बॅगमध्ये बियाणे उपलब्ध होत आहे. त्यालाही पॅकिंग असते व त्यावर आवश्यक मजकूर छापलेला असतो.

बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पाहावी. लेबलवर पिकाचे नाव, जात, उगवणशक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणी, तारीख, महिना व वर्ष, बीजप्रक्रियेला वापरलेले रसायन, बियाणे खरेदी बिलावर छापील बिल क्रमांक असावा. पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.पेरणीनंतर टॅगसह रिकामी पिशवी, बिल जपून ठेवावे. उगवण कमी झाली रिकाम्या पिशव्या, डबे यांची विक्री करू नये.मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये. सरळ वाणाचे बियाणे दरवर्षी खरेदी करून उत्पादन खर्च वाढवू नये. एकदा पिशवीतले बियाणे खरेदी केल्यानंतर त्यापासून चांगले बियाणे करून ते तीन ते चार वर्षे वापरता येते. वजनाविषयी शंका आल्यास ते वजन करूनच घ्यावे. काही कंपन्या बीटी कापसाचे बियाणे विकताना ते लाल्या प्रतिबंधक किंवा अन्य रोगास प्रतिकारक आहे, अशी जाहिरात करतात. बीटी कापूस बियाणे हे फक्त बोंडअळीस प्रतिकारक असल्याचे शेतक-यांनी समजून घ्यावे. यासाठी अशा कंपनीचे होलोग्राम माहीत करून घ्यावे. बियाण्याची खरेदी शासनमान्य/ परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी. 

बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, लेखी तक्रार द्यावी....नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेल करता येईल.

अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदविताना शक्यतो नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा किंवा सदर माहिती एका कागदावर लिहून त्याचे छायाचित्र व्हाटस्अपवर किंवा ई-मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हाट्स अपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

English Summary: Farmers should take care while buying seeds Published on: 02 May 2022, 10:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters