आपन आपल्या मातीमध्ये कार्बन वाढविण्यासाठी खाणीतुन निघणारा कोळसा किंवा जळलेल्या लाकडाचा कोळसा आपन वापरु शकतो का?मला सांगायचं आहे कि आपल्या शेतकरी बांधवांनी शेती मधल्या बारीकसारीक गोष्टींचा विचार,चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी यांचाआत्मविश्वास वाढलं व शेती मधलं ज्ञान आले की ती भीती सुद्धा आपोआप दूर होतेच राव. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकरी वर्गालाऑरगॅनिक कार्बन हे समजू लागले आहे व शेती मधल्या माती साठी महत्वाचे वाटू लागले आहे.आमचं कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती हे सतत मार्गदर्शन करत
असतं व शेतकरी बांधवांना याच महत्व समजून सांगत आहे की शेती मधे सेंद्रिय कर्बाचे महत्वाची भुमिका आहे.जर आपल्या मातीत ऑरगॅनिक कर्ब २% असलातर आपली शेती ची समस्या मिटली म्हणून समजा.दुसरा प्रश्न असाआहे कि सेंद्रिय कर्बा ला आपन कसे वाढवू शकतो व कोणत्या पद्धतीने वाढवण्यास मदत होते या मागे एक तथ्य आहे व दृष्टीकोन सुद्धा आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे. जसे आपन आपले दागिने सुरक्षित जागेवर ठेवतो किंवा कपाट मध्ये सुरक्षित ठेवतो असेच या निसर्गाचे आहे जसे निसर्ग महत्वाच्या मूलद्रव्यांना जतन करून ठेवतो.
मूलद्रव्याच्या बंधाच्या मदतीनं जसे कि त्याला उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावे लागतं हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.उदा० समजून घेऊ महासागरातून जे खनिज तेल काढतोत्यापासून पेट्रोल डिझेल, रस्ता बनवण्यासाठी लागणारे डांबर बनते. तुम्हाला आश्चर्य वाटेल यामुळे कुत्रिम शुगर बनवली जाते जी कि खूप साऱ्या खाण्याच्या गोष्टी मध्ये वापरली जाते. हे उदाहरण यासाठी दिले कि तुम्हाला सोप्या भाषेत समझावे जसे कि रस्ता बनवण्यासाठी लागणारे डांबर मध्ये शुगर आहे पण ती काढावी लागते. आपण सरळ डांबर नाही खाऊ शकत तसेच घरचा कोळसा
किंवा खाणी चा कोळसा कार्बनचा मोठा स्रोत भरपूर आहे पण त्यामध्ये ऑक्सिजन चे प्रमाण खूप कमी असल्यामुळे झाडांना उपलब्ध होत नाही हो काही शाश्त्रज्ञ घरचा कोळसा मातीच्या जलधारण क्षमतेला वाढवण्यासाठी वापरण्याचा सल्ला देतात याचा खूप प्रचार होतो पण यामुळे ऑरगॅनिक कार्बन चा स्रोत असल्याचा कोणत्याही पुरावा नाही यामुळे घरचा आणि खाणी चा कोळसा शेतीत डायरेक्ट कार्बन चा स्रोत म्हणून वापर करण्याचा काही फायदा नाही.जर आपल्या मातीत ऑरगॅनिक कर्ब २% असलातर आपली शेती ची समस्या मिटली म्हणून समजा.
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
Mission agriculture soil information
Save the soil all together
Share your comments