अनाथांची माय म्हणून जगभर ख्याती असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे दररोज कार्यक्रमा निमित्त भ्रमण व्हायचे. वय होत आलेलं, हाडे कमजोर झालेली तरी मनात धगधगती उमेद घेऊन त्या फिरत राहायच्या.
असाच एक प्रवास - सिंदखेडराजा मतदार संघातून त्यांचा (जालना नाव्हा सिंदखेडराजा) जाण्याचा योग आला. माई व गाडीचा चालक रस्ता मार्गक्रमण करत होते एवढ्यात अचानक जोरदार झटका बसला... खड्डा होता. रस्त्यात चालक कुशलतेने गाडी चालवत होता पण खड्ड्याने घात केला, गाडी जोरात आदळली. माई जोरात वेदनेने विव्हळल्या “ अग आईई गं माईच्या कंबरेची व मनकेची हाडे गंभीर पणे दुखावली गेली.
“ जगभर जिच्या पुत्राची ख्याती ते महाराज शिवछत्रपती शिवराय याचं आजोळ असणाऱ्या मातृतीर्थाची एवढी दयनीय अवस्था.? याठिकाणचा प्रतिनिधी कोण आहे.? यावेळी विधानसभेत नव्यानेच निवडून आलेले डॉ. शशिकांत खेडेकर यांना फोन लावला गेला.
“ अरे काय रे बाळा, मातृतीर्थाचा तू लोक प्रतिनिधी एवढ्या थोर अस्मिता असलेल्या मतदार संघाचा तू प्रतिनिधी अन काय हि रस्त्याची अवस्था ! माई कळवळून बोलत होत्या, वेदना असाह्य होत होत्या माई चे शब्द मोजकेच होते पण शेलके होते. आमदार साहेबांनी माईची माफी मागितली त्यांचे ही मन भरून आले.
अनाथांची माई वेदनेत होती, काय करू मी काय नाही असे डॉ. शशिकांत खेडेकर यांना झाले ते फक्त एवढेच बोलले ‘ माई मी नव्यानेच या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी झालो आहे, माई म्हणाल्या, हो बाळा ! मला माहित आहे तू आई जिजाऊचा लेक आहेस अन बाळासाहेबांचा सच्चा सैनिक आहेस, तू हा रस्ता लवकरात लवकर तयार कर आणि जनतेचा त्रास कमी कर. तेंव्हा आमदार डॉ. शशिकांत खेडेकर बोलले ‘ माई मला फक्त दोन महिन्यांचा वेळ द्या त्याच्या आतच हा रस्ता गुळगुळीत तयार करून देईल. माई बोलल्या “ बघ बर बाळा तू कोणाला शब्द देत आहे त्याचा विचार कर असा पुनरुच्चार माईंनी केला,
तेंव्हा डॉ. शशिकांत खेडेकर यांनी माई मी विचार पूर्वक शब्द दिला आहे असे सांगितले. त्या नंतर आमदार साहेबांनी एक महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण केले.
माईला शब्द दिला होता तळमळ लागली होती अनाथांची माई या रस्त्यांच्या दुरवस्था मुळे दुखी झाली होती ते शल्य मनात होतेच, रस्ता पूर्ण झाला माईला पूर्ण झालेल्या रस्ता पाहण्यास यावे अशी विनंती केली. माईने मान्य केले व पुन्हा कार्यक्रमा निमित्त याच रस्त्यावरून जाण्याचा त्यांचा योग आला. ज्या ठिकाणी गाडी आदळली होती त्या ठिकाणी आल्यावर त्यांना मागचा प्रसंग आठवला आणि शब्द दिलेले आमदार शशिकांत खेडेकर आठवले. माईचे अंतकर्ण भरून आले क्षणाचा हि विलंब न लावता त्यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याशी संपर्क केला. माई खूप आनंदी झाल्या होत्या अंतकरण गदगद झाले होते. त्या गहिवरल्या शब्दात बोलल्या “बाळा मी पुन्हा त्याच रस्त्याने जात आहे. पण आज तक्रार नाही तुझा अभिमान वाटत आहे. कौतुक वाटतय तू मला दिलेला शब्द पूर्ण केला.”
आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांनी त्याच ठिकाणी येवून माईची भेट घेतली चरण स्पर्श केला. माई गाडीतून उतरल्या, त्यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “ आता पर्यंत मला शब्द देणारे बरेच पाहिले परंतु शब्द पाळणारा तू एकमेव आहेस. तू आयुष्यात खूप मोठा होणार बाळा असा आशीर्वाद माई नी दिला. ”
माईंना भावपूर्ण श्रद्धांजली !
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments