स्वतः शेतात कष्ट करा, झिझा, पाणी व मातीचा अभ्यास करा,कोणतीही फसवनुक करू नका स्वतःचा कष्टाने ब्रँड झाला पाहिजे, मग बघा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही मित्रांनो.
हवा, रूबाब ज्यांना करायचा त्यांना करू दया, वेळ आपलीही येणार आहे, यावर विश्वास ठेवा. स्वतःला मातीत मिसळून घ्या एकरूप व्हा आपल्या शेतातील मातीला समजून घ्या ज्यांच्या पायाला चप्पल मिळत नव्हती, त्यांना फॉर्च्यूनर मधून फिरवलंय या मातीनं. नाळ जोडली जाणं महत्वाचं.. पैसा नव्हे. आयुष्यातला फुकट जाणारा वेळ शेतीत घालवा आपल्या माती चे गुणधर्म ओळखा. त्यात कोणती पिके चांगली येतात ते पहा शेतातील मातीचा, पाण्याचा अभ्यास करा. एवढच काय सापळे लावून किडे, मावा, किटक यांच्या नोंदी ठेवा आपल्या शेतात कोणते गवत किती प्रमाणात आहे,
, हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं होय हे सहज शक्य आहे पण गरज आहे ती स्वतःला शेतीशी एकरूप करून घेण्याची मित्रांनो शेती केली आणि लगेच मालामाल झालो, असं होत नाही एकवेळ शिक्षण घेऊन नोकरी करणे सोपंय. पण शेती करण सोप नाही बरं शेतकर्याचा एखादा मुलगा नोकरीसाठी
हिंमतीने गांव सोडतो, आई बाप सोडतो, बायका मुले सोडतो, मग शेती करतानाच कुठे जाती तुमची हिम्मत आमची चूक एकच झाली खोटा रूबाब आणि कर्ज काढून केलेली हवा, आम्हाला कष्ट करून जगू ही देईना आणि मरू ही देईना हवा आणि रूबाब करण्याचे दिवस तर आपले येणारच आहेत मित्रांनो, मग हा गोंधळ कशासाठी थोडं थांबा,
झिजा आणि मग उजळा! काय शक्य नाही जे मोठे आहेत अशा प्रत्येकाने संघर्ष केलाय, म्हणून आज त्यांचे दिवस आलेत. तुम्हीही लढून पहा मजा तर येईलच, पण तुम्हाला तुमचा हा स्वभाव संघर्षवादी बनवेल तुमचीही 25.30 लाखाची गाडी असेल, आणि पाई चालूनही तुमचा ब्रँड तयार झालेला असेल आपण काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही, असे आपण भांडणात म्हणतो. तोच बाणा शेतीत दाखवून पहा एकदा मित्रांनो शेती व्यवसाय करून मिळवलेली संपत्ती कधिच सरत नाही, आणि चोऱ्या, लबाडी करून मिळवलेली संपत्ती कधिच पूरत नाही,
हा महाराष्ट्रातील मातीतला इतिहास आहे मित्रांनो अनेक गोष्टी ऐशोअराम आपली वाट पाहतेय, म्हणून पेटून उठा लागा कामाला बघूच कसं होत नाही ते पहिला डाव मांडा.दूसरा तयार ठेवा अपयश आले तर हसून सोडून द्या संघर्ष जेव्हढा मोठा, यश तितकेच मोठे असेल हे नक्की
नोकरी सारखेच शेतात आठ तास काम करा बघा क्लास वन अधिकार्यांच्या पेक्षा आपला इन्कम नक्कीच जास्त राहील. जगाने कोरोना संकट काळात पाहीलच आहे की, सर्व उद्योग धंद्यापेक्षा शेतीच सर्व श्रेष्ठ आहे. कितीही अडचण येउ द्या एक गुंठा सुद्धा जमीन विकु नका.
Share your comments