मात्र काही शेतकरी पीक एक महिन्याचे झाल्यानंतर पिकामध्ये युरिया खत देतात.असे करणे म्हणजे उदपदान खर्चात वाढ करून उत्पादन घटीला आमंत्रण दिल्या सारखे आहे.अवेळी युरिया खत दिल्यास कर्ब नत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची वाढ मोठया प्रमाणात होते.त्यामुळे फुळधारणा व फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येतें. याच बरोबर पाने लुसलुशीत झाल्याने पिकाकडे किडी आकर्षित होऊन कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या खत मात्रेनंतर सोयाबीनला युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डॉ. टी. यस. मोटे यांनी केले आहे.
सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पिक असून या पिकाच्या मुळावर गाठी असतात. गाठिद्वारे हवेत उपलब्ध नत्र शोषले जाते व तो सोयाबीन पिकाला उपलब्ध होत असतो. त्यामुळे सोयाबीन पिकास युरिया खताची मात्रा देण्याची अवशक्यताच नसते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकास युरिया खताची मात्रा देण्याचा अट्टाहास करू नये. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. या आठवड्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकालस आधार झाला आहे. आता शेतकरी या पिकाला युरिया खताची मात्रा देण्यावर भर देत आहे.
त्यामुळे फुळधारणा व फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येतें.याच बरोबर पाने लुसलुशीत झाल्याने पिकाकडे किडी आकर्षित होऊन कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या खत मात्रेनंतर सोयाबीनला युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डॉ. टी. यस. मोटे यांनी केले आहे.सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पिक असून या पिकाच्या मुळावर गाठी असतात. गाठिद्वारे हवेत उपलब्ध नत्र शोषले जाते व तो सोयाबीन पिकाला उपलब्ध होत असतो. त्यामुळे सोयाबीन पिकास युरिया खताची मात्रा देण्याची अवशक्यताच नसते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकास युरिया खताची मात्रा देण्याचा अट्टाहास करू नये.
Share your comments