माॅन्सूनच्या परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांत राज्यात धुमाकूळ घातला आहे.दिवाळीत पावसाची शक्यता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पुणे, मराठवाड्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, त्याचा
सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.Farmers have been hit the most.हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात आता महाराष्ट्रावर आणखी नवं संकट उभे राहिले आहे.
मोठी बातमी! राज्यात 'या' 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सीतरंग चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवसांत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा,
सांगली, कोल्हापूर, तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात पावसाची शक्यता आहे.सीतरंग' चक्रीवादळाचे संकट बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. उत्तर अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली
आहे. उद्यापर्यंत (ता. 20) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 22 ऑक्टोबरपर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल.'सीतरंग' चक्रीवादळामुळे येत्या 23 व 24 ऑक्टोबर दरम्यान पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Share your comments