मोहरी हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे पीक (crops) आहे. बरेच शेतकरी मोहरी पिकातून चांगले उत्पादन घेत आहेत. हे एक तेलबिया पीक आहे, ज्याला सिंचनाची आवश्यकता असते. आज आपण मोहरीच्या महत्वाच्या वाणाविषयी माहिती जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो मोहरी पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी चांगल्या बियाणांची गरज असते. मोहरीच्या सुधारित जातींची शेती केल्यास तुम्हाला चांगले उत्पादन मिळू शकते.
मोहरीच्या ‘या’ 5 जाती
पुसा मोहरी RH 30, राज विजय मोहरी-2, पुसा मोहरी 27, पुसा बोल्ड, पुसा डबल झिरो मोहरी ३१ या 5 सुधारित जातींची लागवड तुम्ही करू शकता. महत्वाचे म्हणजे मोहरीची ही जात १२०-१३० दिवसांत तयार होते.
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
राज विजय मोहरी
2 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. या पिकापासून शेतकऱ्यांना हेक्टरी 20-25 क्विंटल उत्पादन मिळू शकते. त्यात तेलाचे प्रमाण 37 ते 40 टक्के असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पुसा मोहरी 27 ही जात भारतीय कृषी संशोधन केंद्र, पुसा, दिल्ली येथे तयार करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
या जातीचे पीक शेतात 125-140 दिवसात तयार होते आणि त्याची उत्पादन क्षमता 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे. ही जात देशातील अनेक राज्यांमध्ये घेतली जाते. मात्र राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी पुसा बोल्ड जातीची मोहरी लागवड मोठ्या प्रमाणात होते. या जातीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
12 वर्षानंतर वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाचा योग; राशीभविष्य काय सांगतंय? जाणून घ्या
सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी
LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ
Share your comments