आपण बघतो की शेतीमध्ये आधुनिकतेच्या काळात अनेक बदल करण्यात आले आहेत. असे असताना आता याचे परिणाम देखील समोर येऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतीमध्ये प्लास्टिक मल्चिंगचा वापर वाढत आहे. याचे फायदे असले तरी आता तोटे समोर आले आहेत. किडीपासून बचावासाठी आणि जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी (Plastic Mulching) प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला जातो.
असे असताना आता प्लास्टिक मल्चिंगमुळे देशातील अनेक भागांतील मातीत मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. मायक्रोप्लास्टिकमुळे माती आणि पर्यावरणाची तर हानी होतेच पण मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्लास्टिक मानवाच्या फुफ्फुसात आणि रक्तामध्ये देखील प्रवेश करते. यामुळे हे धोकादायक आहे.
टॉक्सिक लिंक या पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. मातीच्या नमुन्यांमध्ये जड धातूंचे अस्तित्वही आढळून आल्याचेही अहवालात आढळून आले आहे. मानवी रक्तामध्येही पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे शेती व्यवसयात वापरला जाणाऱ्या मल्चिंगवर अन्य पर्याय शोधावा लागणार असल्याचा सूर या अहवालातून समोर आला आहे.
यामुळे आता याकडे सर्वानी बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी शेतीसाठी प्लास्टिक मल्चिंगचा वापर करतात. याबाबत (Maharashtra) महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतातील मातीचे नमुने परीक्षणाचा अभ्यास करुन शेतातील मातीत मायक्रोप्लास्टिकचा शोध घेण्यात आला आहे. जमिनीत ओलावा आणि उत्पादन वाढीसाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. आता मात्र हे जीवावर उठणार आहे.
यामध्ये आर्सेनिक, शिसे, बोरॉन आणि कॅडमियम यांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले. ओल्या जमिनीतील धातूंचे वजन आणखी वाढलेले आढळून आले. यामुळे अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात याला पर्याय बघावा लागणार आहे. अनेक शेतकरी गवत येऊ नये म्हणून याचा वापर करत होते.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्याचा दिलदारपणा! कर्जबाजारी झाला पण पट्ट्याने फुकटातच कांदा वाटला
गोड उसाची कडू कहाणी! एकीकडे ऊस तोडला म्हणून मिरवणूक तर दुसरीकडे गळ्याला फास
गोड बातमी : बंद पडलेल्या 11 साखर कारखान्यांना आता मिळणार नवसंजीवनी
Share your comments