शेती हा खानदानी व्यवसाय आहे,पहिले शेती व्यवसाय हा वरिष्ठ,नोकरी हा कनिष्ठ मानला जायचा,आज ही शेती व्यवसाय वरिष्ठच आहे फक्त कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली,हेच कटु सत्य आहे..पण शेती हा व्यवसाय पहिल्या सारखा कष्टाचा नाही राहिला त्यात कमालीचा बदल झाला आहे...यांत्रीकीकरणामुळे अनेक काम सोपे झाले आहे..शेती हा व्यवसाय पूर्वी पासून सुरु आहे
म्हणुन भारत देश हा सत्तर टक्के कृषी प्रधान आहे.So India is 70% agricultural country.शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या टिकणारा आहे.आज तुम्ही करताय उद्या तुमचे मुलं करतील तो न बंद होणारा व्यवसाय आहे,आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही,असली कोणाची विकाऊ तरी एक पण नोकरीवाला शेती विकत घेऊ शकत नाही अगदी बारा लाख रुपये
पॅकेज असेल तरी दोन एकर शेती घेऊ शकत नाही,शेतकरी हा उत्तम,टिकाऊ व्यवसाय आहे.भविष्यात नोकरी कोणतीच राहणार नाही म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे,शेतकरी मुलाची किंमत येत्या पाच वर्षात आपल्याला कळेल त्या वेळेस आपल्याकडे पश्चाताप शिल्लक राहील..शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब
ऐकायची गरज नाही,टार्गेट नाही,कोणी आपले मालक नाही,कॉम्पिटिशन नाही, व्यवसाय कायम स्वरूपी टिकाऊ,शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा,लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटर पर्यंत शेतात फिरा,सर्व भाजीपाला,दुध,आपल्याच शेतातील उपलब्ध,घर
भाडे नाही,पाणीपट्टी नाही,ग्रामीण भागातील मज्जा जरा वेगळीच आहे,सर्व गाव ओळखीचं दररोज जेव्हा आपण जेवायला बसतो.तेव्हा अन्नाकडे बघुन शेतकऱ्यांला दुआ द्या.तुम्ही त्याच दुआवर दोन वेळेचे जेवण मिळेल.शहरामध्ये कोण शेजारी राहते हे माहिती नसते. परंतु गावात दररोज रात्री पारावर लोकं बसलेले असतात
Share your comments