सध्या ऑनलाइन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (farmers) वरदान ठरू लागला आहे. आज आपण ऑनलाइन व्यवसाय (Online business) काय आहे आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होणार याची माहिती घेणार आहोत.
ऑनलाईन साईट्स विषयी प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. ज्याद्वारे घरबसल्या शेतकरी आपल्या शेतातील फळे ,भाजीपाला विकू शकतात.
१) बिग बास्केट ऑनलाइन साइट
या साईट वरून तुम्ही घरच्या आरामात हिरव्या भाज्या, भाज्या, फळे, दूध इत्यादी ऑर्डर करू शकता आणि ते सहज तुमच्या घरी सामान पोहोचवतात. मात्र बिग बास्केटवाले (Big Basket) या गोष्टी कुठून आणतात?
हा सर्व माल शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचतो. यानुसार जर तुम्हाला तुमचा माल ऑनलाइन विकायचा असेल, तर तुम्हाला बिग बास्केट साइटवर (Big Basket Site) जाऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर शेतकऱ्यांना कच्चा माल सहज विकला जाईल आणि घरबसल्या चांगला नफाही मिळेल.
शेतकरी मित्रांनो बँक खात्याशी त्वरित आधार जोडणी करा; लवकरच दिले जाणार प्रोत्साहनपर अनुदान
२)इन्स्टा मार्ट
शेतकरी मित्रांनो स्विगीचे नाव तुम्ही ऐकले असेल. परंतु रोजच्या गरजांची ऑनलाइन (online) मागणी पाहता स्विगीने इंस्टा मार्ट करून लोकांसाठी सेवा सुरू केली आहे.
जिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रोज ताज्या हिरव्या भाज्या, फळे इत्यादी घरी बसून ऑर्डर करू शकता. शेतकरी स्वत: या ऑनलाइन व्यवसायात सहभागी होऊन चांगला नफा मिळवू शकतात. शेतकर्यांना या साइटवरूनच नोंदणी करून आपला माल विकावा लागेल.
३)ब्लिंकिट/ग्रोफेर्स
ब्लिंकिट 10 मिनिटांच्या आत ग्राहकांना वस्तू पोचवते. त्यामुळे त्याची लोकप्रियता खूप वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोक इथूनच फळे आणि भाज्या मागवतात.
शेतकरी मित्रांनो चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही आपली फळे आणि भाजीपाला (Fruits and vegetables) या ठिकाणी विकू शकतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळेल आणि भाजीपाला बाहेर जाऊन विकण्याची गरज पडणार नाही.
Deshi Cow: संकरीत गायीच्या पोटी देशी गाय; कृषी विद्यापीठाचा प्रयत्न यशस्वी
४)जेप्टो
शेतकरी या अॅपवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि ताज्या हिरव्या भाज्या, फळे यासारखी कच्ची पिके विकू शकतात. याठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनाचांगला नफा मिळवू शकतो.
ऑनलाइनसाठी विक्रीसाठी प्रक्रिया
1) सर्वप्रथम तुम्हाला तुमची फळे आणि भाजीपाला कोणत्या ऑनलाइन साइटवर विकायची आहे ती साईट निवडा.
2) तुम्ही तुमची फळे आणि भाजीपाला एकापेक्षा जास्त ऑनलाइन साइटवर विकू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करावे लागेल.
3) त्यानंतर तुम्ही त्या साइटवरून विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करा.
4) त्यानंतर, तुम्हाला कोणता माल विकायचा आहे ते अपलोड करावे लागेल.
5) शेवटच्या टप्प्यात, जेव्हा तुमचा माल ग्राहक खरेदी करेल, तेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी येईल आणि त्या ऑनलाइन कंपनीद्वारे वस्तू घेऊन जाईल.
महत्वाच्या बातम्या
Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही
पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले हप्ता...
Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव
Share your comments