कृषिप्रधान देशात शेतकरी फाशीशी आणि उद्योगपती तुपाशी आहे .शेतकरी आणि भांडवलदार उद्योगपतींचा व्यवसाया मधील साम्य आहे. कारण दोघेही उत्पादक आणि उद्योजक आहेत.दोघेही शेतमजूर,कामगारांना रोजगार देतात.दोघांनाही वीज ,पाणी ,जमीन,इनपुट्स लागतात.भारताचा आर्थिक प्रगतीमध्ये कृषी व औद्योगिक क्षेत्राचा वाटा आहे,परंतु शेतकऱ्यांनाच सगळ्या बाजूने जखडून टाकून त्यांचे शोषण केले आहे.
शेतकऱ्यांची उत्पादकता प्रचंड गुणाकाराची आहे
तर उद्योगपतींची वजाबाकीमध्ये.उदा.शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करतो,उद्योगपती मात्र एक कुंटल लोखंडपासून 60-65 किलो गजाळी बनवतो.
शेतकऱ्यांना रात्रीला कमी दाबाने वीज दिली जाते उद्योगपतींना मात्र 24 तास.शेतीला पाण्याचे पण तसेच आहे,धरणातील पाणी साठा अगोदर पिण्यासाठी होतो नंतर कृषिसिंचन साठी ,उद्योगाला मात्र 24 तास भरपूर पाणी दिल जात.
शेतकऱ्यांचा मालाची किंमत हि मिनिमम सपोर्ट प्राईज MSP (कमीतकमी आधार किंमत ) शासन ठरवते ,उद्योगाला मात्र मॅक्झिमम रिटेल प्राईज MRP( अधिकाधिक किंमत ) तो स्वतः ठरवतो.
शेतकऱ्यांनी उत्पदकता कृषी उत्पन्न बाजार समितीचाच आवारातच विकायचे बंधन आहे तर उद्योगपतींना मात्र कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य आहे.शेतकऱ्यांचा मालाला निर्यातबंदी,अनावश्यक बाहेरून आयात अशी आवश्य्कवस्तू कायद्याने बंधने घातली उद्योगपतींना मात्र कुठेही विकण्यास स्वातंत्र्य,जागतिकीकरण आणि मुक्त अर्थवेवस्थेमुळे फायदा झाला.शेतकऱ्यांचा दोन साखर कारखान्यातील हवाई अंतर 25 km पाहिजे,उद्योगपतींना मात्र MIDC मधी हजारो कारखाने टाकण्यास वाव.
शेतकऱ्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या शेतजमिनीची सिलिंग कायद्याने मर्यादा तर उद्योगपतींना
व्यवसायासाठी अमर्याद जमीन खरीदीचे अधिकार.म्हणूनच सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण,कृषिप्रधान देशात शेतकरी फाशीशी आणि उद्योगपती तुपाशी.
शेतकरी आणि भांडवलदार उद्योगपतींचा व्यवसाया मधील साम्य आहे. कारण दोघेही उत्पादक आणि उद्योजक आहेत.दोघेही शेतमजूर,कामगारांना रोजगार देतात.दोघांनाही वीज ,पाणी ,जमीन,इनपुट्स लागतात.भारताचा आर्थिक प्रगतीमध्ये कृषी व औद्योगिक क्षेत्राचा वाटा आहे,परंतु शेतकऱ्यांनाच सगळ्या बाजूने जखडून टाकून त्यांचे शोषण केले आहे.
विक्रांत पाटील,अकोट,अकोला
Share your comments