शेतीमध्ये चांगले उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी (farmers) नवनवीन पिके घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अशी काही पिके आहेत ज्यामधून शेतकरी अगदी सहज उत्पादन घेऊ शकतो. शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात या भाज्यांची लागवड (Cultivation of vegetables) केली तर नक्कीच दुप्पट उत्पन्न मिळेल.
शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात अशी अनेक पिके आहेत, ज्यातून तुमचा अनेक पटींनी फायदा होऊ शकतो. जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात योग्य पिकाची लागवड (Cultivation of crops) केल्यास त्यांना चांगला नफा मिळेल.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चुकीचे पीक लावल्यास त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे फायदा मिळेल अशा ऑगस्टमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या भाज्यांबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
हे ही वाचा
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..
गाजर शेती
ऑगस्ट महिन्यात गाजराची लागवड (Cultivation of carrot) करून शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात. कारण ऑगस्ट महिन्यानंतर बाजारात गाजराची मागणी अधिक वाढते. त्यामुळे गाजराला देखील चांगला दर मिळेल.
बीट शेती
शेतकरी बीट लागवडीतून चांगला नफाही मिळवू शकतात. ही अशी (Crops For August) लागवड आहे, जी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मातीत वाढू शकते. परंतु बीट लागवड करताना शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था असावी हे लक्षात ठेवा.
हे ही वाचा
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..
फुलकोबीची शेती
शेतकरी वर्षभर त्यांच्या शेतात फुलकोबीची लागवड (Cultivation of Cauliflower) करू शकतात. मात्र हिवाळ्याच्या काळात बाजारात त्याची मागणी सर्वाधिक असते. अशा स्थितीत ऑगस्ट महिन्यात लागवडीस सुरुवात केल्यास बाजारात अधिक नफा मिळू शकतो.
पालक शेती
सर्व भाज्यांमध्ये पालकाला विशेष स्थान मिळाले आहे. ही भाजी खायला प्रत्येक व्यक्तीला आवडते. हिवाळ्यात बहुतेक लोक ही भाजी आवर्जून खातात. याशिवाय पालक पीक पावसाळ्यात चांगले उत्पादन देते. येत्या काही (Crops For August) महिन्यांत बाजारात पालकाची मागणी झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासूनच त्याच्या लागवडीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
Benefit of Cultivation: शेतकऱ्यांनो 'ही' शेती करणार तुमच्या आयुष्याची दिवाळी, जाणून घ्या शेतीबद्दल..
Crop cultivation! फायदेशीर लागवड; शेतकऱ्यांनो पावसाळ्यात 'या' पिकाची शेती करा व्हाल लखपती
भारीच की! 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा भाजीपाला; कमी वेळेत मिळणार दुप्पट उत्पन्न
Share your comments