कीटकनाशकांच्या (Insecticide) वापरामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे रासायनिक किटकनाशकांचा (Insecticide) वापर करण्यास सरकारने मनाई केली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पिकांवरील कीड नष्ट करणार कशी? याविषयी आपण जाणून घेऊया..
अशा वेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करणे योग्य ठरेल. शेतकरी शेतात लेमनग्रास (Lemongrass) स्प्रे चा वापरू शकता. हा स्प्रे तुम्ही घरबसल्या काही मिनिटातच बनवू शकता.
लेमनग्रास स्प्रे (Lemongrass spray) झाडांवर किंवा पिकांवर (Crop) फवारल्याने किडही कमी वेळात पळून जातील आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही. याशिवाय पावसात वाढणारे कीटकही घरातून हाकलले जाऊ शकतात. याशिवाय पावसात वाढणारे कीटकही घरातून हाकलले जाऊ शकतात.
हे ही वाचा
Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..
लेमनग्रास एक औषधी वनस्पती (Medicinal plants) आहे. याचा उपयोग अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय त्याच्या पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन करणेही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
लेमन ग्रास स्प्रे असा बनवा
सर्वप्रथम लेमन ग्रासची पाने स्वच्छ करून बरणीत टाका. नंतर बरणीत 2 ते 3 कप पाणी टाकून चांगले बारीक करा. नंतर ते गाळून स्प्रे बाटलीत भरावे. यानंतर, स्प्रे बाटलीमध्ये बेकिंग सोडा / कडुनिंबाचे तेल आणि हायड्रोजन पेरॉक्साइड द्रव ठेवा, चांगले मिसळा. यानंतर अतिरिक्त पाणी घाला आणि चांगले मिसळा.
हा स्प्रे कीड नष्ट करण्यासाठी उपयोगी पडेल. सध्या शेतात सेंद्रिय खत (Organic Fertilizer) किंवा सेंद्रिय फवारणीचा वापर वाढविण्यावर शासन भर देत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही (Subsidy) दिले जात आहे. यासोबतच अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे कामही केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर
Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड
Share your comments