1. कृषीपीडिया

शेती ला शास्त्राची असलेली ओळख

शेती ला शास्त्राची असलेली ओळख

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती ला शास्त्राची असलेली ओळख

शेती ला शास्त्राची असलेली ओळख

मंडळी आज शेती विषयक पारंपरिक शेती मधले निगडीत शास्त्र ते विज्ञान काही गोष्टी आपला शेतकरी निसर्गपुजक हे सर्वाना माहिती असेल पण या मधल्या काही गोष्टी चां आपन उलगडा करूया आपले वडील आजोबा जेव्हा कापुस पेरणी शेती मधे करायचे तेही सरकी बियाणे याला माती लावायचे व एक दोन कांदे त्या मधे असायचे याचं कारण काय असेल, त्या मागे खुप मोठं विज्ञान आहे सरकीला माती लावण्याचे कारणं म्हणजे माती लावलेल्या बियाण्यास पक्षी, उंदीर,की किटक खात नाही व दुसरं म्हणजे ति सुपिक माती बियाणे उगवण्यासाठी मदत करतं असते आज आपन ति संस्कृती विसरलो आहे.पावसाचा अंदाज आपले पुर्वज चांगल्या तर्हेने लावत होते ते म्हणजे संकेत देणारे किट जसे की मुंगी व माकोडे हे जमिनीतून 

माती काढते व कावळा आपले घरटे झाडाच्या उंच फांदीवर करतं असतात.चिमण्या आपले अंग पाण्याने भिजवते.खुप काही असे तथ्य आहे.आपली शेती ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे महत्वाचे आहे आपल्या वंशजांना माहिती होत्या त्या मधली म्हणजे सांकेतिक पिकं व आताचे पिवळे चिकट सापळे याही गोष्टी चां उलगडा करूया पिवळे सापळे जितकें चांगले तितकेच वाईट आता ही गोष्टीच तथ्य पाहू या आपन जेव्हा शेतामध्ये चिकट सापळे लावतो त्याला आकर्षीक होऊन शत्रू किटका सोबत मित्र किटक ही त्या सापळ्याला आकर्षित होतात नुकसान आपलेच आहे.

निसर्गाशी शेतकरी जुळुन असल्याने त्याला सर्व बारकावे माहीतअसतात.आपल्या शेतातील मुळ समस्या आहे कीट व्यवस्थापन या बद्दल थोडं समजून घेऊ आपण दिवाळीमधे दिप लावतो, घरात दारात शेणखत जेथे असेल तेथे शेतामध्ये याचं कारण कि जी वेळ असते ती किटक प्रजननाची जेव्हा आपन आपल्या शेतामध्ये दिप लावतो त्या दिप कडे आकर्षण होऊन किट मरण पावतो श्रावण महिन्यात किड व किटकाचा प्रादुर्भाव जास्त असतो.मि या गोष्टी चा बारकाईने अभ्यास केला की या मागे काही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे कारण आपली शेती संस्कृती महान आहे.

या सर्व गोष्टी चां उल्लेख कृषी पराशर या संस्कृत ग्रंथात सुद्धा आहे.सितादहीच्या बाबतीत तर सांगितलेच आहे.खुप असे शेती बाबत दृष्टीकोन आहे.आपले पुर्वज कधी शेणाच्या स्लर्या करत नव्हते कारण त्यांचा विश्वास शेणखतावर जास्त होता.आज विश्वास रासायनिक खतांवरआहे.

आज आपन पाहीले तर संत्रावर डायबॅक ,तुर व हरभरा वरील मर हि सर्व कारण मातीमध्ये रासायनिक क्रिया होय.या गोष्टी ची कारण मातीमधले जिवाणू शत्रू बुरशीशि लढण्यास असमर्थ आहे.या सर्वांचं एकच कारण शेणखतातील जिवाणूचा अभावामुळे माती या प्रतीसाथ देत नाही.आपले वंशजांना शेती समज व उमजत होती म्हणून आज ची सुपिक जमिन त्यांनी दिलेलं दान आहे.

 

save the soil all together

मिलिंद जि गोदे

9423361185

English Summary: Farmer introduction to technology study Published on: 16 April 2022, 05:06 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters