रब्बी ज्वारी खाण्यासाठी आणि रब्बी ज्वारीच्या कडब्यास दुग्ध व्यवसायात जनावरांच्या व्यवस्थापनात कोरडा चारा म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी रब्बी ज्वारी तयार झाल्यानंतर जवळच्या स्थानिक बाजारपेठेत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारी व कडबा विकतात.
यावेळी बाजारभाव खाली आलेले असतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व कडब्याची साठवणूक करून बाजारभावाप्रमाणे त्याची विक्री करावी.
रब्बी ज्वारीचा कडबा जनावरांना अतिशय पाचक असून, त्याला राज्य तसेच परराज्यांतील पशुपालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्वारीचा कडबा नगावर न विकता त्याची कुट्टी करून शहराजवळील गोठ्यांमध्ये त्याची विक्री करता येईल.
100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:चा संघ तयार करून ग्राहकांना रब्बी ज्वारी, कडबा व मूल्यवर्धित पदार्थ यांची विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र! नाशिकच्या शेतकऱ्यांचे कांद्यासाठी उपोषण..
रब्बी ज्वारीच्या चार्याचे मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ सायलेज, कडबा कुट्टी, कडबा बारीक करून त्याचे चौकोनी ठोकळे तयार करणे, ज्वारीच्या कडब्याबरोबर हरभरा, भुईमूग, तूर, मूग, उडीद इत्यादी भुसकटांचा वापर करून योग्य मिश्रण तयार करता येते.
महत्वाच्या बातम्या;
बिल गेट्स यांनी IARI ला भेट, हवामान बदल आणि वैज्ञानिक शेतीवर केली चर्चा..
पिंजऱ्यातील मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा, ही पद्धत वापरून पहा
यशवंत कारखाना सुरू होणार का? हालचाली सुरू, सभेचे आयोजन
Share your comments