महाराष्ट्रात सगळीकडे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लष्करी आळी चे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याबाबतची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
लष्करी आळी चे व्यवस्थापन:
- मका पिका भवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- वेळेवर खुरपणी व कोळपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
- अंडीपुंज, समूहातील लहान अळ्या आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावा.
- मक्या वरील लष्करी अळी च्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावे.
- मक्या वरील लष्करी अळी च्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावे.
- सामूहिकरीत्या मोठ्याप्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावे. यासाठी पंधरा कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. तसेच प्रकाश सापळे लावावेत.
- केळीचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी व परोपजीवी कीटक ( ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, केम्पोलेटीस)यांचे संवर्धन करावे. त्यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
- ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवी ग्रस्त पन्नास हजार अंडी प्रतिएकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा किंवा कामगंध सापळा मध्ये तीन पतंग सापळा आढळून आल्यास शेतात सोडावेत.
- रोप आवस्था ते सुरुवातीची पोंग्याच्या अवस्था या कालावधीत पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणू जन्य किटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणीसाठी कीटकनाशके
- झाड जर पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त असेल तर निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 पी पी एम, स्पाईनोटोरम 11 टक्के एस सी
- झाड जर 10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त असेल तर थायमेथॉक्झाम 12.6 टक्के+ लैमडा सायक्लोथ्रीन 9.5 टक्के झेड सी किंवा क्लोरेनट्रानीलिप्रोल 18.5 टक्के एससी
कीटकनाशक फवारताना विशेष सूचना
1 रासायनिक कीटकनाशकांची फवारणी चारा पिकावर करू नये.
- एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये.
- तुऱ्यची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.
- फवारणी करतांना मजूर आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
- एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.
Share your comments