काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे..सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते,फुले लागत असल्याने गुलबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते,फुले यावर अंडी घालतात,त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल.
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्टरी 05 या प्रमाणात लावावीत़.Scent traps for pink bollworm should be planted at the rate of 0.5 hectare.मोठ्या प्रमाणात पतंगजमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे 8 ते 10 कामगंध सापळे लावावेत.ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी 2-3 या प्रमाणात पीक 60 दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.
5 टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची 800 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.1.प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली प्रती एकर किंवा 2.इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 88 ग्रॅम प्रती एकर किंवा
3.प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) 400 मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे.वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके,विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये
अधिक माहितीसाठी संपर्क करा
डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी ०२४५२-२२९०००
Share your comments