शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे परंतु त्यासाठी लागणारे योग्य नियोजन न झाल्यास शेतकऱ्यांचे वांदे मात्र ठरलेले असतात. फक्त नियोजन नीट नाही करता आले म्हणून नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे. खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेत असताना रोपवाटिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे असे राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राच्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून सांगितले गेले आहे. तसेच रोगाचा प्रादुर्भाव रोखता यावा आणि उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी वर्गाने बीज प्रक्रिया करूनच रोपे टाकावी असे सांगण्यात आलेले आहे.
कांदा हे नगदी पीक:-
कांदा हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते जे की एक मसाला पीक आहे. भारतीय नागरिकांच्या रोजच्या आहारामध्ये कांदा या पिकाला एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. जगातील स्तरावर कांदा पिकाचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रामुख्याने पाहायला गेले तर कांदा हे पीक थंड वातावरणात घेतले जाते मात्र खरीप, रब्बी आणि रांगडा या तिन्ही हंगामात हे पीक घेतले जाते.
हेही वाचा :जाणून घ्या काकडीची लागवड; पेरणीचा योग्य मार्ग आणि उत्पादन कालावधीत कोणती खबरदारी घ्यावी?
कांदा लागवडीचं नियोजन कसं असावं:-
जेव्हा तुम्ही कांदा पिकाची लागवड करणार आहे त्यावेळी तुम्ही जी जागा निवडणार आहात ती जागा समतोल व पाण्याचा निचरा करणारी असावी. एक एकर कांदा लागवड करण्यासाठी सुमारे आठ ते दहा किलो बियाणे वापरावे. ज्या ठिकाणी कांदा लागवड करणार आहे त्या ठिकाणी मोठे झाड नसले पाहिजे तसेच गादी वाफे तयार करतेवेळी ते ३ मीटर लांब असावे ३ मीटर रुंद असावे व १५ सेमी उंच असावे. प्रति मीटर चार किंवा पाच ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन मिसळून प्रत्येक गादीवाफ्यात 15 ते 20 किलो ग्रॅम शेणखत किंवा ८ ते १० किलो ग्रॅम गांडूळखत मिसळावे.
कांदा वाफ्यात पाच ते सात सेमी अंतरात एक सेमी खोलीच्या ओळी पाडून त्यामध्ये बियाणे टाकावे. कांदा बियानास प्रति १ किलो २ ग्रॅम कॅप्टन अथवा थायरम चोळावे त्यामुळे रोपे कोसळत नाहीत.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्याआधी असे नियोजन करावे त्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे वाढू शकते. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्याने एकदा तरी राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राला भेट द्यावी असे सांगितले आहे.
Share your comments