कृषी महोत्सव 2022 जिजामाता महाविद्यालय प्रांगण बुलढाणा येथे दि.28 मार्च सोमवारला संपन्न झाला या कृषि महोत्सवा मध्ये सन 2020-2021या वर्षी रब्बी हंगाम हरभरा पिक स्पर्धा सर्वसाधारण गट चिखली तालुक्या मधुन तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्या बद्दल विजय हिंमतराव भुतेकर सवणा यांचा शाल श्रीफळ प्रमाण पत्र तसेच सन्मान चिन्ह देवुन बुलढाणा जिल्हाचे जिल्हाधिकारी एस.राममुर्ती,अमरावती विभागाचे क्रुषि सहसंचालक किसन मुळे,जिल्हा क्रुषि अधिक्षक नरेंद्र नाईक,डॉ पि.के.व्हि.सदस्य विनायक सरनाईक,
क्रु.वि.केद्राचे वरीष्ट शास्त्रीज्ञ डॉ सी.पी.जायभाये, डॉ प्रमोद बकाने,क्रुषि विकास अधिकारी अनिसा महाबळे,बेतीवार,संतोष डाबरे,पटेल,क्रु.वि.केद्र जळगाव जामोद चे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशात कोठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा द्वारे सन राज्यस्तरीय पिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेची सुरुवात रब्बी हंगाम 2020-21 पासुन करण्यात आली.या स्पर्धे मध्ये चिखली तालुक्यातुन बरेच शेतकऱ्यांनी भाग घेतला होता
यातील सवणा येथील प्रगतशील शेतकरी विजय हिमंतराव भुतेकर यांनी तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने राज्य शासनाने क्रुषि विभागा मार्फत राज्य स्तरीय पिक स्पर्धा आयोजीत केली होती.या स्पर्धेत विजय भुतेकर यांनी हेक्टरी 32 क्किंटल 50 किलो इतके विक्रमी उत्पादन हरभरा फुले विक्रम या पिकातुन मागील वर्षी घेतले आहे.या भागातील प्रगतशील शेतकरी म्हणुन त्याची ओळख आहे.कृषी महोत्सव 2020 मध्ये प्रयोगशील शेतकरी विजय भुतेकर यांना
सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.
या वेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी शेतकरी गटाचे सदस्य तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रु.वि.केद्राचे वरीष्ट शास्त्रीज्ञ डॉ सी.पी.जायभाये, डॉ प्रमोद बकाने,क्रुषि विकास अधिकारी अनिसा महाबळे,बेतीवार,संतोष डाबरे,पटेल,क्रु.वि.केद्र जळगाव जामोद चे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशात कोठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Share your comments