सध्या शेती व्यवसायात बदल करणे अतिशय महत्वाचे बनले आहे. शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करण्याचा कृषी वैज्ञानिक देखील सल्ला देत असतात. कृषी वैज्ञानिक यांच्या मते, शेतकऱ्यांनी पीक पद्धत्तीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी बांधव बाजारात ज्याची अधिक मागणी असते अशा पिकांची लागवड करू शकतात.
या अनुषंगाने आज आपण बाजारात कायम मागणी असलेल्या निलगिरी झाडाच्या शेती विषयी जाणुन घेणार आहोत. खरं पाहता निलगिरीचे झाड आपणास रस्त्याच्या किनारी सहज बघायला मिळाले असेल. मात्र याची शेती क्वचितच शेतकरी बांधव करत असतात.
अनेकांना निलगिरीचे झाड बिनकामी वाटत असेल मात्र याची फर्निचर इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी असते. यामुळे या झाडाची शेती शेतकऱ्यांना विशेष फायदेशीर ठरू शकते. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की निमगिरी शेतीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खूपच कमी परिश्रम घ्यावे लागतात शिवाय या शेतीची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. यामुळे याची शेती अलीकडे व्यावसायिक स्तरावर केली जाऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
लई भारी! नोकरीला लाथ मारली अन शेती सुरु केली; आज करतोय चांगली कमाई
दुःखद! वावरात उभ्या ऊस पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ओढवली नामुष्की; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
कोणत्या जमिनीत/हवामानात आणि केव्हा केली जाते निलगिरी लागवड
निलगिरी लागवड खरं पाहता कोणत्याही जमिनीत करता येणे शक्य आहे. याची लागवड कोणत्याही जमिनीत केली तरीदेखील यापासून दर्जेदार असेल लाकडाचे उत्पादन मिळवता येते. निलगिरीचे झाड कोणत्याही हवामानात चांगले वाढत असल्याने भारतातील कोणत्याही प्रदेशात याची लागवड केली जाऊ शकते. निलगिरीचे झाड पावसाळा हिवाळा उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये चांगले वाढत असल्याने याची शेती कोणत्याही ऋतुत शक्य आहे.
एका एकरात किती झाडे लावली जातात
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांना एक हेक्टर क्षेत्रात निलगिरीची लागवड जर करायची असेल तर त्यांना सुमारे 3000 हजार रोपांची आवश्यकता भासणार आहे. निलगिरीची रोपे शेतकरी बांधव त्यांच्या जवळील रोपवाटिकेतून विकत घेऊ शकतात.
नर्सरीत यां रोपांची किंमत 8 रुपयांच्या आसपास असते. यानुसार, एक हेक्टर क्षेत्रात याच्या रोपंसाठी जवळपास 24 हजार रुपये खर्च करावा लागेल. शिवाय लागवडीचा खर्च पकडता शेतकऱ्यांना एकूण 30 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. निश्चितच 30-35 हजार रुपये खर्च करून शेतकरी बांधव लाखोंची कमाई करू शकतात. म्हणजे निलगिरी लागवड शेतकऱ्यासाठी फायद्याचा सौदा आहे असेच म्हणावं लागेल.
निलगिरीची काढणी केव्हा अन उत्पन्न किती
कृषी तज्ञांच्या मते, निलगिरीचे झाड केवळ 5 वर्षांत काढणीसाठी तयार होत असते. म्हणजेच पाच वर्षानंतर या झाडापासून उत्पादन घेतले जाऊ शकते. असे सांगितले जाते की, एका झाडापासून सुमारे 400 किलो निलगिरी लाकूड मिळत असते. अशा तऱ्हेने बाजाराचा विचार केला तर निलगिरीचे लाकूड सहा ते सात रुपये किलो दराने विकले जाते. म्हणजेच एका हेक्टरमध्ये तीन हजार झाडे लावलेली असली तर शेतकरी बांधव यातून 72 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतात.
Share your comments