पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol and diesel) सततचा तुटवडा आणि वाढते दर पाहता, आता सर्व वाहन कंपन्या इलेक्ट्रिक (Electric) मोडवर स्विच करण्यात व्यस्त आहेत. या निर्णयाने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.
पुढील वर्षी मार्चपर्यंत ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने भारतात 10 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
लॉन्च करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश असेल. ही वाहने चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स बनवण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. असे कंपनीने सांगितले आहे.
Agriculture Cultivation: ऑगस्टमध्ये करा 'या' शेतीची लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न
OSM कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी भारतात प्रथमच लाँच होणार्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल (Electric tractor) सविस्तरपणे माहिती सांगितली आहे. "कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये आपली संशोधन-विकास केंद्रे (Research and Development Centres) स्थापन केली आहेत.
त्या केंद्रांवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच, आम्ही हे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लाँच (launch) करू. 2022-23 च्या अखेरीस श्रेणी II आणि III शहरांमध्ये या वाहनांची सर्व्हिसिंग आणि भाडेतत्त्वावर देण्याची नवीन संकल्पना देखील आम्ही आणू, असेही ते म्हणाले.
Cotton Crop: कापूस पिकावर 'या' किडींचा प्रादुर्भाव; त्वरित करा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान
फरीदाबादमध्ये कंपनी OSM इलेक्ट्रिक तीन वाहने (Three electric vehicles) बनवते. याशिवाय छोटी व्यावसायिक वाहनेही कंपनी बनवतात. बाजारातील मागणी पाहता त्यांची कंपनी लवकरच ड्रोन, ट्रॅक्टर (Drones, tractors) आणि दुचाकी बाजारात आणणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
OSM कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लॉन्च (Three-wheeler launch) करून भारताच्या ऑटो क्षेत्रात प्रवेश केला. सध्या दिल्लीत या ऑटोची किंमत 3.40 लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांचे पुढचे काही दिवस संकटाचे; जाणून घ्या राशिभविष्य
शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई
Mixed Fisheries: मिश्र मत्स्यपालन तंत्राचा लावला शोध; शेतकरी यातून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न, जाणून घ्या..
Share your comments