वांगी फळपिकाच्या ‘या’ सुधारित जाती; देतील भरघोस उत्पन्न

07 April 2021 07:46 PM By: KJ Maharashtra
वांग्याची लागवड

वांग्याची लागवड

जर तुम्ही भाजीपाला शेती करत असाल आणि वांग्याची लागवड करायची असेल तर चांगल्या प्रतीच्या वांग्याचे वाण कोणते याची माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

वांगे या फळपिकाच्या काही सुधारित जातींविषयी या लेखात माहिती घेऊ.

 मांजरी गोटा

 या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्यम आकाराचे असतात. या झाडाच्या खोड पाने  आणि फळांच्या देठावर काटे असतात.  या झाडाची फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार मध्यम ते गोल असतो. या वांग्याच्या जातीची फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर चार ते पाच दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल येते.

हेही वाचा : भाजीपाला शेती, वांग्याचे रोपे लावल्यानंतर ‘या’ किडीचा होतो प्रादुर्भाव

वैशाली

 या जातीचे झाड फुटके आणि पसरट असून पाने खोड आणि पानांच्या देठावर काटे असून फळे आणि फुले झुबक्यानी  येतात.  फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. या झाडाची फळे मध्यम आकाराची असून अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्पादन तीनशे क्विंटलपर्यंत येते.

 

 प्रगती

या जातीचे वांग्याचे झाड हे उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाच्या असतात. पाने फळे आणि फांद्यांवर गाठी असतात. या जातीच्या वांग्याची फुले आणि फळे झुबक्यांनी येतात. फळेही अंडाकृती आकाराचे असून फळांचा रंग आकर्षक जांभळा व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला असतो. या प्रकारच्या कामाचा कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. या जातीच्या पिकाचे हेक्टरी  सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल पर्यंत येते.

 अरुणा

 या जातीच्या वांग्याची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुमक्या लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. या जातीच्या वांग्याचे तरी सरासरी उत्पादन तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंत येते. वांग्याच्या रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि  चकचकीत असताना काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते तसेच जुने फळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही.  

चार ते पाच दिवसांच्या अंतराने दहा ते बारा वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. वांग्याच्या पिकाचे सरासरी एकरी उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे असून ते 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

वांगी वांगी लागवड भाजीपाला शेती eggplant crop वांग्याची लागवड eggplant crop cultivation
English Summary: Egg plant’s modified Varieties

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.