1. कृषीपीडिया

हळदीमधील कुरकुमीन प्रक्रिया उद्योग विदर्भात स्थापनेसाठी प्रयत्न गरजेचे :- कुलगुरु डॉ. विलास भाले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये हळद उत्पादक आणि निर्यातक मेळावा संपन्न

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हळदीमधील कुरकुमीन प्रक्रिया उद्योग विदर्भात स्थापनेसाठी प्रयत्न गरजेचे

हळदीमधील कुरकुमीन प्रक्रिया उद्योग विदर्भात स्थापनेसाठी प्रयत्न गरजेचे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये हळद उत्पादक आणि निर्यातक मेळावा संपन्न आणि सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत केरला यांचा संयुक्त उपक्रम

मसाला पिकांचे औषधी गुणधर्म जगासमोर प्रदर्शित करणे गरजेचे:- डॉ. होमी चेरियन

 भारतीय शेती अधिक फायदेशीर होत शेतकरी शाश्वत होण्यासाठी जागतिक बाजारपेठांचा आढावा घेणे काळाची गरज असून कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मसाला पिकांची औषधी गुणधर्म संपूर्ण विश्वासमोर प्रदर्शित करणे कालसुसंगत असल्याचे वास्तविक प्रतिपादन सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत चे संचालक डॉ. होमी चेरियन यांनी केले. उद्यानविद्या विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आणि सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत, केरळ यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक उद्यानिकी विकास मिशन अंतर्गत "हळद उत्पादक आणि निर्यातकांचे मेळावा " प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते उपस्थितांना संबोधित करत होते. 

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ग्राम गिरड येथील मगन संग्रहालयात आयोजित या अतिशय महत्त्वाकांक्षी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची उपस्थिती होती तर अधिष्ठाता कृषी डॉ. ययाति तायडे, अधिष्ठाता उद्यान विद्या तथा प्रकल्पाचे नोडल ऑफिसर डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नागपूर डॉ. देवानंद पंचभाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा श्री अनिल इंगळे, विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉ. अरविंद सोनकांबळे यांचेसह एकात्मिक उद्यानिकी विकास मिशन प्रकल्पाचे विद्यापीठ प्रकल्प समन्वयक प्रा. डॉ. विजय काळे यांची सभा मंचावर प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी विदर्भामध्ये हळदीची प्रत

आणि हळदी पिकाखालील क्षेत्र वाढत लक्षात घेता हळद प्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण होत कुरकुमीन प्रक्रिया उद्योगासाठी मोठा वाव असल्याचे सांगतानाच अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग विदर्भातील शेती व्यवसायाला नवा आयाम देणारा सिद्ध होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी अधिष्‍ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे यांनी वायगाव आणि वर्धा जिल्ह्यातील हळदीची अद्वितीय प्रतवारी आणि गुणवत्ता लक्षात घेत संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये क्षेत्र वाढ होणे या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय प्रगतीचे लक्षण ठरणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी आपल्या अजोड कामगिरीने सन्मानास पात्र ठरलेल्या विविध शेतकरी उत्पादक कंपनी तथा शेतकरी बांधवांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये वायगाव हळद उत्पादक संघ समुद्रपूर, मगन संग्रहालय समिती गिरड, गायधने नैसर्गिक शेती, खैरगाव, शेतीवाडी प्रतिष्ठान शिवण फळ, 

 विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनी, जैविक शेती मिशन समुद्रपूर, कृषकोंनाती शेतकरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी,वायगाव, हरिद्रा संजीवनी प्रकल्प वायगाव, कमलनयन बजाज फाउंडेशन, समुद्रपूर यांचेसह ॲग्रोवन चे ज्येष्ठ पत्रकार विनोद इंगोले यांचा समावेश होता. या मेळाव्याचे औचित्य साधत हळदीचे विविध उत्पादने जसे बेणे, हळकुंड, प्रक्रियायुक्त पदार्थ, लोणची, कुरकुमीन टेबलेट्स आदींचे मोठे प्रदर्शनाचं परिसरातील शेतकरी बांधवांना नवीन संदेश देऊन गेले.या अतिशय महत्त्वाकांक्षी मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात, अधिष्‍ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे यांचे नेतृत्वात विभागप्रमुख भाजीपाला शास्त्र विभाग डॉ. अरविंद सोनकांबळे प्रकल्प समन्वयक डॉ. विजय काळे यांचे सह प्रा.अभय वाघ, डॉ. बावकार व भाजीपाला शास्त्र विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि अथक परिश्रम घेतले. मेळाव्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. विजय काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण भारतभरातून विविध राज्यातील निर्यातक व परिसरातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी मध्ये साधक-बाधक चर्चा होऊन काही करार सुद्धा अस्तित्वात आले.

English Summary: Efforts are needed to establish curcumin processing industry in turmeric in Vidarbha: - Vice Chancellor Dr. Vilas bhale Published on: 17 March 2022, 01:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters