कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून ते मुख्यत्वे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेतले जाते. परंतु कांदा हा नाशवंत पदार्थ आहे. कांदा हा विविध पदार्थांमध्ये आणि विशेषतः औषधी गुणधर्मासाठी उपयोगी आहे. कांद्यात असलेल्या घटकांमुळे मुळव्याध,मूत्राशय कॅन्सर,हृदयासंबंधीच्या आजार यावर उपयुक्त आहे. या लेखात आपण या उपयुक्त कांद्या संबंधीचे निर्जलीकरण नेमके काय आहे हे पाहणार आहोत.
कांद्याचे निर्जलीकरण म्हणजे काय?
कांद्यामध्ये जवळजवळ 90 टक्के पाणी असतं.कांद्या मधील हे पाणी बाष्पाच्या स्वरूपात बाहेर काढणे व कांद्याचे सूक्ष्मजीव आणि इतर घटकांपासून संरक्षण व्हावे यासाठी ही प्रक्रिया केली जाते. निर्जलीकरण प्रक्रिया केलेले कांदे हवाबंद डब्यात मध्ये पॅक करून निर्यात केले जातात. निर्जलीकरण केलेले कांदे हे सात ते बारा महिन्यांपर्यंत चांगले टिकतात.
कांदा निर्जलीकरण या विषयी महत्त्वाचे मुद्दे
- निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा किंवा अधिक टीएस एस असलेला कांदा वापरला जातो. निर्जलीकरण कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
- कांदा निर्जलीकरण करण्यासाठी कांद्याचा शेंडा व टोका कडील भाग कापून व त्यावरील साल काढून चार ते आठ मी मी जाडीच्या चकत्या करतात.
- या तयार केलेल्या चकत्या मिठाच्या द्रावणात दोन तास भिजत ठेवून 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या फ्लूडाईझ्ड बॅड ड्रायरमध्ये 11 ते 13 तासांसाठी ठेवतातया तापमानाला कांद्यातील आंबलं व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्म जिवाणू पासून संरक्षण केले जाते.
- प्रक्रियायुक्त मालाचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी तो हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशव्यामध्ये पॅक करतात. कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक प्रकारचे फायदे होतात. प्रामुख्याने सुकवलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च हा तुलनेने कमी येतो. तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही.
- परदेशांमध्ये कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मांसच्याहवाबंद पदार्थामध्ये स्वास, चिलि या सारख्या पदार्थांमध्ये करतात.
Share your comments