कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त घेतले जाते पण यंदा पूर्ण राज्यात शेतकऱ्यांनी कांद्यावर भर दिला आहे. पाऊसामुळे खरीप व रब्बी हंगामाचे नुकसान झाले आहे मात्र ही पहिलीच वेळ असेल जे पाऊसामुळे उन्हाळी हंगामाला फायदा होत असेल. सोयाबीन चे क्षेत्र सुद्धा पहिल्यांदाच उन्हाळी हंगामात वाढले आहे तर दुसऱ्या बाजूस शेतकरी कांदा उत्पादणावर भर देत आहेत. ऊस पाठोपाठ कांदा हे नगदी पीक महत्वाचे मानले जाते. यंदा उन्हाळी वातावरणात पोषक असल्यामुळे कांदा चांगला वाढणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पाणी पुरवावे त्यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी होणार आहे.
बदलती लागवड पध्दती शेतकऱ्यांच्या फायद्याची :-
कमी कालावधीत जास्त उत्पादन भेटावे अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे जे की आधुनिक यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. कांदा पिकात खत, कीड-रोग बरोबर सिंचन व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. काळाच्या ओघात गादी वाफे तयार करून कांद्याची लागवड केली जात आहे. ठिबकद्वारे पाण्याची बचत तर होतच आहे आणि कष्ट सुद्धा कमी होत आहे. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची क्षमता वाढते असे कृषितज्ञांचे मत आहे. जे की पिकसंबंधी हा बदल शेतकरी सुद्धा स्वीकारत आहेत.
ठिबक सिंचनाचे काय आहेत फायदे?
ठिबक सिंचन केल्याने जास्त प्रमाणात पाणी वाया जात नाही तसेच पिकाला समप्रमाणत पाणी भेटते. पिकांना खते देण्यात येतात त्यामुळे लागवड क्षेत्र सुद्धा वाढते आणि एकरी उत्पादन वाढते. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत होते. काळाच्या ओघात मजुरांची टंचाई भासत आहे आणि अनियमित वीज पुरवठा असल्याने ठिबक सिंचन च उपयोगी पडत आहे.
ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान :-
१. इच्छुक व्यक्तीला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करून मुखपृष्ठावर टॅग दिसेल त्यावर क्लिक करावे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा वर क्लिक करून पर्याय ओपन करा त्यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि स्वतःची माहिती भरावी. माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय निवडा.
२. दिलेली माहिती पूर्ण भरावी. ज्या पिकासाठी ठिबक सिंचन पाहिजे ते पीक निवडावे. पूर्वसंमती घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी. सर्व भरलेली माहिती सेव्ह करावी. त्यानंतर मुख्य मेनुवर जा आणि ऑप्शन वर क्लिक करा. मेनू व आले की अर्ज सादर करावा यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका व योजना चे नाव दिसेल.
३. यानंतर अति शर्ती मान्य कराव्यात आणि अर्ज सादर करावा लागेल. ही पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर अकाउंट मधून २३ रुपये ६० पैसे भरावे लागतील जे की सर्व ऑनलाइन प्रक्रिया असणार आहे.
Share your comments