परिषदेवर प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, युवा उद्योजक तथा प्रगतीशील कास्तकार विठ्ठल सरप पाटील यांची नामनिर्देशित नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील तरतुदीनुसार प्रगतिशील शेतकरी या प्रवर्गातून प्रति कुलपती यांनी विठ्ठल सरप पाटील यांचे नामनिर्देशन केले असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयाच्या वतीने
याबाबत 28 जानेवारी 2022 रोजी आदेश काढण्यात आले आहेत. हे नामनिर्देशन पुढील आदेशापर्यंत किंवा जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे.
विठ्ठल सरप पाटील यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळून राजकारणामध्ये आपल्या कार्याची छाप उमटविली आहे. तसेच अकोल्यातील युवा उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे. विठ्ठल सरप पाटील हे प्रगतीशील कास्तकार असून शेती व शेतकरी याबाबत त्यांना चांगली जाणीव आहे.
राजकारण, समाजकारण, उद्योग व कृषी अशा सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाद्वारे आपले चांगले स्थान निर्माण करणाऱ्या विठ्ठल सरप पाटील यांच्या या नामनिर्देशित नियुक्तीमुळे शेती व शेतकरी यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने व समस्या याबाबत ते कार्यकारी परिषदेवर चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, युवा उद्योजक तथा प्रगतीशील कास्तकार विठ्ठल सरप पाटील यांची नामनिर्देशित नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील तरतुदीनुसार प्रगतिशील शेतकरी या प्रवर्गातून प्रति कुलपती यांनी विठ्ठल सरप पाटील यांचे नामनिर्देशन केले
Share your comments