1. कृषीपीडिया

तुम्हाला माहिती आहे का या आयुर्वेदिक वनस्पती चे आरोग्यदायी फायदे ? वाचा सविस्तर माहिती

निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे त्याचा वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुम्हाला माहिती आहे का या आयुर्वेदिक वनस्पती चे आरोग्यदायी फायदे ? वाचा सविस्तर माहिती

तुम्हाला माहिती आहे का या आयुर्वेदिक वनस्पती चे आरोग्यदायी फायदे ? वाचा सविस्तर माहिती

निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे त्याचा वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे. आपल्याला कोणताही रोग झाला त्यावर मात करण्याची शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. जसे की वनस्पतीच्या माध्यमातून आपण तो रोग बरा करू शकतो. असेच काही रोग व त्यांच्यावर वनस्पती द्वारे होणारा उपचार हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पुदीना

- पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

– जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजी पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

– मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

– जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.

– जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

– जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.

–सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.

कोरफड

– रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

– शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते.

– मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

– संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते.

तुळस

– लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो.

– तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो.

– फार डोके दुखणे ( मायग्रेन ), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते.

कोथिंबीर

– कोथिंबिरीचे पानं खाल्ल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

– एखाद्या व्यक्तीला खाज व पुरळची समस्या असेल तर त्यांनी कोथिंबीरीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावावी. या उपायाने लगेच आराम मिळेल.

– पित्ताचा त्रास असल्यास कोथिंबीरीच्या पानांचा थोडासा रस सेवन केल्यास आराम मिळेल.

– कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो.

– टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो.

 

अडुळसा

– अडुळसाया झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा.

-खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.

कडूनिंब

–  हे झाड सर्वांची ओळख आहे. त्याची फळे, फळे, तसेच खोडी औषधे आहेत. या वापराच्या लाभाच्या रोगाकरता पानांचा.

– त्यांच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि मोठ्या प्रमाणावर भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा गोळा करून काढा वापरता. हे एक उत्तम जंतुसंसर्ग आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोकीच्या बाहेरील भागाचाही ब-याच उपाय काढतो.

- या झाडाची लागवड करणे आणि त्याची काळजी घेणे हे आपल्या फायद्याचं आहे. तेल तयार करावे पानांचे पाणी कडून १०० मि. तार रस काढावा. 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंदाचेवर ते झाकून आवे. साधारण अर्ध्या तासात बाहेरचा अंश निघून गेला. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवणे वर्षभर सहज टिकतं. सुंदरेवर हे लावणे ती लवकर बरी होते.

बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.

English Summary: Do you know the health benefits of this plant? Read detailed information Published on: 18 April 2022, 01:11 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters