बोकड्या व्हाईरस वर एक उत्तम पर्याय आहे हे एक औषध म्हणुन या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ठेवा, चला तर सुरूवात करूया.आपण हे जे मिरचीसाठी टॉनिक बनवणार आहोत त्यासाठी काही साहित्याची गरज आपल्याला लागणार आहे.
साहित्य -
पन्नास लीटर वेस्ट डिकंपोझर मल्टीफ्लाय केलेले तीन कीलो झिंगा पावडर ही पावडर आपल्याला सुके बोंबिल सुकट सुकी मासळी विकनार्याकडे ही पावडर मिळेल ही स्वस्त ही असते ही पावडर आपल्याला घ्यायची आहे.
क्रुती -
एक जुने सूती कापड किंवा फडके घ्या त्यामध्ये तीन कीलो झिंगा पावडर टाका त्याच एक गाठोडे तयार करा क्या गाठोड्याला एक दोरी बांधा हे गाठोडे वेस्ट डिकंपोझर मल्टीफ्लाय केलेल्या पन्नास लीटर च्या बँरल मध्ये टाकुन द्या दोरी वर काढुन ठेवा बँरल चे तोंड बारदानाने बांधुन घ्या हे द्रावण पाच दिवस रोज सकाळी दोरी वर खाली ओढुन द्रावण चांगले हलवुन घ्या पाच दिवसांनी हे द्रावण वापरन्यासाठी तयार आहे. आता हे वापरायचे कसे हे पाहु हे द्रावण फक्त फवारनीसाठीच वापरायचे आहे
मित्रांनो हे मिरची वरील बोकड्या व्हाईरस वर फक्त एकदाच फवारायच आहे हे मिरची च्या आयुष्यात तीन वेळा वापरायचे आहे याच प्रमाण आहे पंपाला शंभर मिली महीन्यातुन एकदाच फवारायच आहे हे द्रावण आपल्याला तीनच दिवसात संपवायचे आहे ह्या द्रावणामध्ये कँलसियम मँगनेशियम फेरस बोरॉन नायट्रोजन पोटँशियम असे अनेक मुलद्रव्य असतात त्याचा पुरावा म्हणुन सोबत टेबल देत आहे हे साठवुन ठेवा येत नाही नंतर वेस्ट डिकंपोझर मधील गाठोडे सोडुन त्यातील आेली झिंगा पावडर मिरची च्या बुडाशी टाकुन द्या याचा खत म्हणुन उपयोगी होतो तरी मित्रांनो या द्रावणाचा एक वेळ आवश्य वापर करा
रीझल्ट खूप चांगले आहेत सोबत मूलद्रव्य सुध्दा चांगले भेटतात. त्यामूळे हे टॉनिक आपण नक्की बनवा आणि वापरा च बोकड्या व्हाईरस वर एक उत्तम पर्याय आहे हे एक औषध म्हणुन या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ठेवा
Share your comments