MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

अशाप्रकारे करा बीट लागवड मग होईल फायदाच

सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अशाप्रकारे करा बीट लागवड मग होईल फायदाच

अशाप्रकारे करा बीट लागवड मग होईल फायदाच

सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. बाजारात याची चांगले मागणी आहे.

जमिनीचा प्रकार

बिटच्या लागवडीसाठी भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. तसेच भारी जमिनीत बीटाची लागवड केल्यास बीटाच्या मुळाचा आकार वाकडा होतो. या साठी जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असावा. तसेच ९ते १० सामू असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत बीटाची वाढ चांगले होते तसेच बीट ची महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केली जाते.

हवामान

बिट हें थंड हवामानातील पीक असून या काळातील हवामान पोषक असते बीटची रब्बी हंगामात ऑक्टोबर मध्ये बी पेरणी केली जाते परंतु महाराष्टामध्ये जून व जुलै मध्ये बियांची पेरणी केली जाते.

पिकाची जात

डेट्राईट डार्क रेड, क्रीम्सन ग्लोब, अर्ली वंडर

लागवड

एक हेक्टर साठी ७ ते १० किलो बियाणे लागते.बियाणां ची लागवड पेरून किंवा टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी २ बिया टोकून लागवड करावी बीटासाठी ४५ सेमी अंतरावर सरीवर करावी आणि सरी वरंबा १५ ते २० से मीटर अंतरावर बियाणे लागवड करावी. बियाणे उगवून आले की विरळणी करून एका ठिकाणी १ च रोप ठेवावे. तसेच बी लागवड करण्या पूर्वी बियाणे राञभर भिजत ठेवावे म्हणजे बियाणे चांगले उगवते. बियाणे जमिनीत लागवड करण्यापूर्वी जमिनीत ओलावा असावा, बीट ची लागवड ३०-४५ बाय १५ ते २० सेमीटर अंतरावर वर करावी.

खत व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे ६० ते ७० किलो नत्र,१०० ते १२० किलो स्फुरद आणि ६० ते ७० किलो पालाश हेक्टरी दयावे. नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद आणि पालाशची पूर्ण मात्रा बियांची लागवड करताना दयावी व नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही पेरणी नंतर ४ ते ६ आठवडयांनी द्यावी.

पाणी व्यवस्थापन

कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा.जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

रोग नियंत्रण

१) मावा :पानातील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होते पिकाची वाढ खुंटते.

उपाय :टाटा माणिक - ८ ते १० ग्राम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी. अथवा निमार्क २५- ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 तुडतुडे :पानातील रस शोषण करते.

उपाय :अरेवा ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अथवा निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) सफेद माशी :पानातील रस शोषण करते. उपाय- उलाला ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४) पाने खाणारी अळी व फळातील अळी :पाने खाते व फळाच्या आत मध्ये अळी तयार होते त्यामुळे फळ वाकडे होते.

उपाय :निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व किडलेली फळे काढून टाकावी नंतर फवारणी करावी.

English Summary: Do this procedure off beet plantation after will more benefits Published on: 17 February 2022, 07:55 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters