1. कृषीपीडिया

माती परिक्षण करा व हजारो रूपयांची बचत करा

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला अस्वस्थ वाटायला लागते तेव्हा आपण डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून उपचार घेतो

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
माती परिक्षण करा व हजारो रूपयांची बचत करा

माती परिक्षण करा व हजारो रूपयांची बचत करा

त्याचप्रमाणें मातीचेही तसेच सूत्र आहे, माती परीक्षण केल्याने मातीची तपासणी होते व योग्य उपचार आपल्याला मातीवर करता येतात जेणेकरून आपले उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादनही वाढते. आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते. शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. 

तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. 

यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते 

तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते. पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3, सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P, पालश K , फेरस(आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, सल्फर S, Boron B त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर पीकांची वाढ पूर्ण होत नाही. 

ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते. विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणे आवश्यक असते. त्याद्वारे शेतक-यांना समजते की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे 

किंवा जास्त आहे,मातीपरीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते,माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते.

 त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. याद्वारे शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो,पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते, त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते,अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो,जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता  येते, 

माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्‍यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो,जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते कळते

३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH , विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, फेरस (आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, सल्फर S, बोरान B यासाठी परीक्षण केले जाते.

 

लेखक - गोपाल उगले

मो - 9503537577

English Summary: Do soil testing and saves money Published on: 01 January 2022, 02:10 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters