शेजारील देश व देशांतर्गत कांद्याची जबरदस्त मागणी असतांना राज्यांच्या त्यातही नाशिक जिल्यातील बाजार समितीत प्रतिदिन जेव्हडी खरेदी ग्रहणक्षमतेपेक्षा अधिक आवक आल्यास बाजार कोसळतात. तोच प्रकार काल सोमवार दि.२८ फेब्रुवारीला घडून आला. पुढेही मालाच्या हेळसांड होऊन बाजार पाडण्याचे काम होईल असे जाणवते.
भावपडीच्या मूळ खोल कारणात न जाता गडबडून काय असे झाले? अश्या भ्रमित अवस्थेत अधिक माल बाजारात शेतकऱ्यांकडून ओतला जाणार असे दिसते. अज्ञानापोटी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी चुकीची करणी घडून येते. मागणी आहे, निर्यात चालु आहे. मग असे का घडते?
शेतकऱ्यांच्या खळ्यावरील हंगामामुळे मालाच्या अधिक उपलब्धतेमुळे अतिरिक्त पुरवठ्याच्या दाबाच्या मानाने बाजार समितीत आठवड्याचे खरेदीव्यवस्थापन अपुरे पडते. आठवड्याचे खरेदी दिवसही कमी पडतात. व्यापाऱ्यांच्या खळ्यावरील लेबर सहित इतर व्यवस्थापन तोकडे पडते. पर्यायाने व्याप्याराचा खरेदी उत्साह मावळतो. त्यामुळेच भाव पडतात. त्यात अधिक भर म्हणून कि काय व्यापारी त्यांच्या सोयीने अश्या अवस्थेत सावरण्यासाठी कमिटीला कारण सांगुन १-२ दिवस मार्केट बंदही ठेवतात. त्यांचे चालते
म्हणून ते करून घेतात अंतिम नुकसान शेतकऱ्यांचेच होते. सुटी नंतर पुन्हा अधिक माल येतो व भाव पडीला आमंत्रण मिळते.
ह्यासाठी अश्या अवस्थेत एखादा महिना
१ - आठवड्याचे ७ दिवस मार्केट चालु ठेवणे.
२- व्याप्यारांचे मार्केट बंद मागणी फेटाळली जावी.
३- मार्केट मध्ये पर्यायी जागेची व्यवस्था आणीबाणीत असायलाच हवी.
४- सण-वार, सुट्ट्या, वर्ष अखेर अश्या कारणांना आणीबाणीत थारा देवू नये.
असे झाले तरच मार्केट कमिट्या शेतकऱ्यांच्या खऱ्या रक्षणकर्त्या ठरतील. नाही तर आम्ही निवडून ह्यांना पाठवायचे आणि व्यवस्थापनाच्या नावाखाली त्यांनी दुसऱ्यांचे हित बघायचे. हे योग्य नाही.
शेतकऱ्यांनी एकजूट होऊन कमिटीवर दबाव आणुन बाजार सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करायला हवेत. असे वाटते. राज्य कांदा उत्पादक संघटना प्रयत्न करत आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
Share your comments