रब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून, त्यात मोहरी, जवस अशा पिकांचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे. या पिकांच्या लागवड व्यवस्थापनाची माहिती घेऊ.जवस - जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.सुधारित वाण : एन एल -९७ व पी. के. व्ही. एन. एल. -२६०बियाणे : ८ ते १० किलो प्रतिहेक्टरी
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझीम किंवा थायरम Carbendazim or Thiram per kg seed before sowing किंवा कॅप्टन २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
या पद्धतीने हरभरा पिकातील तणनियंत्रण खर्च होईल कमी
पेरणी अंतर व पद्धत : ४५ x १० सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.खतमात्रा प्रतिहेक्टरी :कोरडवाहूसाठी - ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरदबागायतीसाठी -६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद.अांतर पिके :जवस + हरभरा (४:२),जवस + करडई (४:२),जवस + मोहरी (५:१)उत्पादन : ५ ते ७ क्विंटल प्रतिहेक्टरी
मोहरी - जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.सुधारित वाण : पुसा जयकिसान, पुसा बोल्ड, शताब्दी आणि जी एम-३बियाणे : ५ किलो प्रतिहेक्टरीबीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे. पेरणीच्या आधी बियाणे ओलसर पोत्यात ठेवले असता उगवण चांगली होते.पेरणी अंतर व पद्धत : ४५ x १५ सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.
खतमात्रा प्रतिहेक्टरी :कोरडवाहूसाठी - ४०किलो नत्र, २० किलो स्फुरद -संपूर्ण पेरणीच्या वेळीबागायतीसाठी - ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी आणि उरलेले नत्र ३० ते ३५ दिवसांनी)अांतरपिके : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२)पाणी व्यवस्थापन : ओलिताची सोय असल्यास,पहिले पाणी शेंगा लागताना (५०ते ५५ दिवसांनी),दुसरे पाणी दाणे भरताना (७०ते ७५ दिवसांनी)उत्पादन : बागायती- १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टरी,कोरडवाहू- ८ ते १० क्विंटल प्रतिहेक्टरी.
विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)
Share your comments