नमस्कार आजच्या लेखात आपल्याला जिवाणू संवर्धनाची गरज का आहे हे वाचायला मिळेल.आजच्या काळात शेतकरी मित्रांनो उत्पादन जास्तीत जास्त कसे घेऊ ही जणु काही स्पर्धा लावलेली आहे असे वाटतंय शेत जमिनिचा स्तर कोठे चाललाय यांच्या वर लक्षच नाहीच आहे.
जमिनीचां नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो बिघडत चालले आहेत. मातीमधला घट्टपणा वाढत चालला हे लक्षण दिसत आहे. त्या मधे जमिनींचा सामू वाढत आहे. जमिनींची मोठी धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनी क्षारयुक्त आणि चोपण बनण्याच्या समस्याही वाढत आहेत. मातीतील सुपीकता व कच खालावत चालल्यामुळे खतांवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. जमिनीची सुपीकता हा जमिनींचा बदलत जाणारा गुणधर्म आहे हे लक्षणे जिवाणू चे संवर्धन नसल्यामुळे झाले आहे.
हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.आज जर मातीमधले जिवाणू वाचवली तर जिवाणू आपल्याला मातीत जाण्यापासून वाचलेलं !
जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते.
वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण जमिनीवर पडतात. शेणकिडे शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात.
अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रीय पदार्थ आपणास ओळखता येतात, पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला आपन ह्युमस असे म्हणतो तरी त्यांचे पुर्ण श्रेय सर्व निसर्गात तयार होणारे जिवाणूला जातंय.आपल्या जमिनीमध्ये जीवाणू आहे बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीवाणु आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला सुपिकमाती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे
मित्रांनो जिवाणू बीजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त काही जैविक स्राव तयार करत असतात. काही तत्त्व बुरशीनाशक तसेच कृमिनाशक म्हणूनही कार्य करतात त्यांचे कार्य असे की ते आपल्या उपजिवीका शोधत असतात.आता काळात बदल झाला आहे शेतकरी अमाप किटकनाशक व रसायनांचा वापर आहे जेवढं आपल्या डोक्यावर चे केस नाही तेवढं किटकनाशके यांचे नावे आहेत.अश्या या कारणामुळे मातिमधील जिवाणू चं अस्तित्व धोक्यात आले आहे.यांचा परीणाम सर्व निसर्गात राहाणारे पशुपक्षी यांच्या वर होईल हे निश्चित याचं साठी मी वारंवार तेच सांगत आहेत की जिवाणू चे संवर्धन करायचं आहे.
Share your comments