बागेतील जमिन स्वच्छ व भुसभुशित ठेवावी. त्याकरिता सुरुवातील कोळपण्या द्याव्यात. पुढे हाताने चाळणी करावी.
केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्या वेळी काढून टाकावीत.
लागवडीनंतर 4 ते 5 महिन्याने झाडांच्या खोडाभोवती मातीवर थर द्यावा.
आवश्यकता भासल्यास घड पडल्यावर झाडास आधार द्यावा.
सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्हणून केळीच्या घडाभोवती त्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्याची प्रथा आहे.
थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्याच्या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.
केळी पिकाला इतर फळपिकांच्या मानाने जास्त पाणी लागते.
दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे व त्यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे.
क्षेत्र वाढीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्यात वाढही शक्य आहे.
केळी हे सर्व फळांमध्ये स्वस्त आहे व त्यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्ध केला जातो.
वाहतूकीसाठी रेल्वेकडून वॅगन्स उपलब्ध केल्या जातात. पण त्यात अल्पशी सवलत आहे. केळी उत्पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्या दराने करणेची व्यवस्था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.
खत व्यवस् थापन
सेंद्रीय खते – शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड
जैवकि खते –अॅझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झााड केळी लागवडीच्या वेळी
रासायनिक खते – केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्फूरद व 200 ग्रॅम पालाश् देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पध्दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.
पाणी व्यवस्थापन
केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मि. पाणी लागते.
केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म नलीका पध्दतीपेक्षा ( मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्य असते.
बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
Share your comments