परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली आहे. भूविकास बॅंकेतून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्यात आलं आहे. जवळपास 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.Important decisions regarding various departments were taken in the state cabinet meeting. त्यात राज्यातील 7 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. अन्य निर्णय खालीलप्रमाणे :राज्य सरकारचे मोठे निर्णय▪️'एमपीएससी'च्या कक्षेबाहेरील गट-ब
(अराजपत्रित), गट -क व गट-ड या पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून 75 हजार पदे भरणार.▪️ वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ▪️ 5G तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी धोरण.
▪️ मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचतगट निर्माण करणार. 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार.▪️ 'महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क' संस्थेस अनुदान देणार.▪️ राजकीय व सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे खटले मागे घेणार.
Share your comments