1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो तुम्हीही घेता का कारल्याचे पिक! जाणुन घ्या कारल्यावर येणारे रोग आणि उपचार.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
bittergourds

bittergourds

शेतकरी मित्रांनो जस कि तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे कि कुठल्याही पिकाला रोगापासून सुरक्षित ठेऊनच आपण चांगले उत्पादन घेऊ शकता म्हणूनच आज आपणासाठी खास घेऊन आलोयेत कारल्यावर पडणारे रोग आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना. तस तर कारल्यावर रोग येण्याचे प्रमाण नगण्यच असत पण तरीही हवामान बदलमुळे कारल्यावरदेखील रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुनच कारल्यावर येणारे काही प्रमुख रोक व त्यावरील उपाय आपण जाणुन घेऊया.

रेड बीटल

ही एक हानिकारक कीड आहे, जो सुरुवातीच्या काळात कारल्यावर आढळतो. हे कीड पाने खाऊन झाडाची वाढ रोखते. त्याची अळी धोकादायक असते, ती कारल्याच्या रोपाची मुळे कापून पिकाचा नाश करते. त्यामुळे साहजिकच उत्पादनावर याचा फरक पडतो.

 रेड बीटल किडवर नियंत्रण कस करणार

रेड बीटलपासून कारल्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी पतंजली निंबाडी कीटकनाशकाचा वापर प्रभावी ठरत आहे. 5 लिटर कीटकनाशक 40 लिटर पाण्यात विरघळून आठवड्यातून दोनदा फवारणी करावी. या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास, प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी 35-40 मिली/पंप किंवा डायमेथोएट 30% ईसी 1 मिली / लिटर प्रमानाने 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

भुरी रोग

हा रोग Erysiphi cicoraceatum मुळे होतो.  यामुळे,  कारल्याची कळी आणि पानांवर एक पांढरे गोलाकार जाळे पसरते, जो नंतर तपकिरी रंगाचा होतो. या रोगात पाने पिवळी पडतात आणि नंतर सुकतात.

 जैविक उपचार -

कारल्याच्या पिकाला या रोगापासून वाचवण्यासाठी 5 लिटर आंबट ताक घ्या, 2 लिटर गोमूत्र आणि 40 लिटर पाणी मिसळा, फवारणी  करा. दर आठवड्याला एक फवारणी करा, सलग तीन आठवडे फवारणी केल्यानंतर कारल्याचे पीक पूर्णपणे चांगले होते.

रासायनिक उपचार -

रोग निवारणासाठी, कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी किंवा अझोक्सीस्ट्रोबिन 23% एससी योग्य डोससह फवारणी करा.

 अँथ्रॅक्नोस रोग

हा रोग बहुधा कारल्यावरच आढळतो.  या रोगामुळे प्रभावित झाडामध्ये, पानांवर काळे डाग तयार होतात, ज्यामुळे झाडे प्रकाश संश्लेषणास असमर्थ बनतात, परिणामी झाडे चांगली विकसित होत नाही.

जैविक उपचार-

रोगाच्या प्रतिबंधासाठी, एक एकर पिकासाठी, 10 किलो गोमूत्रात 4 किलो अळूची पाने आणि 4 किलो कडुनिंबाच्या पानांमध्ये 2 किलो लसूण उकळा, ते थंड करा आणि 40 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. पिकातुन हा रोग पूर्णपणे निघतो.रासायनिक उपचार -

रासायनिक उपचारात एझॉक्सीस्ट्रोबिन 23% SC किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP योग्य डोसमध्ये फवारा.

 

 मोज़ेक व्हायरस रोग

हा रोग विशेषत: कोवळ्या पानांमध्ये येतो, यामुळे पाने कुजल्यासारखी होतात. पाने लहान पडतात आणि हिरवी-पिवळी होतात. संक्रमित झाडांची वाढ कमी होऊ लागते.या रोगाच्या प्रकोपामुळे पाने लहान होतात आणि पानांमध्ये बदल जाणवतो. काही फुले गुच्छांमध्ये बदलतात, प्रभावित झाडे बुटके राहतात आणि अजिबात झाडाला कारले येत नाहीत.

उपचार-

या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा कोणताही प्रभावी मार्ग नाही परंतु विविध उपायांनी तो बराचसा कमी केला जाऊ शकतो.  रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून जाळली पाहिजेत. इमिडाक्लोरोप्रिड 0.3 मिली/लिटरचे द्रावण बनवा आणि 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करा.

 

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters