वर्धा जिल्ह्यातील तारासावंगा या गावात मागील आठवड्यापासून मोसंबी या फळाची बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात गळती सूरी असल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात फळांना बाजारभाव नाही आणि त्यामध्ये या रोगामुळे मोसंबी उत्पादक मोठ्या प्रमाणात संकटात अडकलेले दिसून येत आहेत. फळ गळती झाल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी खूप संकटात आहेत
मोसंबी फळावर अचानक बुरशी रोगाचा हल्ला:
तारासावंगा परिसरात मोसंबी या फळाला चांगला बहार आल्यामुळे तेथील मोसंबी उत्पादकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोसंबी चे फळ वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाने महागड्या औषधांच्या फवारण्या सुद्धा केल्या. मोसंबीच्या झाडावर फळांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे शेतकरी वर्गाची अशा होती की यामधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकल्या नसून काही दिवस वाट पहायचे ठरवले मात्र मोसंबी फळावर अचानक बुरशी रोगाने हल्ला केल्याने जवळपास ५० टक्के पेक्षा अधिक मोसंबी फळाची गळती झाली.
हेही वाचा:मसाल्याचा पदार्थ पिकावा आपल्या शेतात, जाणून घ्या लवंगाची लागवड पद्धत
वर्धा जिल्ह्यातील तारासावंगा परिसरातील साहूर, दृगवाडा, वाडेगाव, जामगाव, माणिकवाडा, वडाळा बोरगाव व वर्धपुर येथे मोठ्या प्रमाणात मोसंबी फळावर बुरशी रोग पडल्यामुळे तिथे मोसंबी पिकाची गळती होत आहे. सध्या बाजारात मोसंबी फळाला भाव १५ ते १८ हजार रुपये प्रति टन आहे मात्र इकडे मोसंबी फळावर बुरशी रोग पडल्याने फळगळती चा विषय शेतकऱ्यांचे संतापाचे कारण बनलेले आहे.
मागील खूप वर्षांपासून जी मोसंबी फळावर रोग पडून फळगळती होत आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात होत न्हवती मात्र इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी फळगळती होत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे.तारासावंगा परिसरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात फळगळती झाल्यामुळे तेथील शेकडो टन मोसंबी फळांचे नुकसान झालेले आहे. जर आशा मोठ्या प्रमाणात जर फळगळ जर सुरू राहिली तर शेतकऱ्यांनी जे महागड्या किमतीत जी औषधे आणली होती तसेच एवढी काळजी आणि जे पैसे खर्च झाले इ. सर्व कष्टावर पाणी फिरेल. या रोगावर तातडीने उपाय सुचवला पाहिजे नाहीतर मोसंबी फळ उत्पादकांचे नुकसान होणार आहे आणि ते नुकसान जर टाळायचे असेल तर कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे अशी मागणी तारासावंगा परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.
Share your comments