युरिया खत हे इतर खतांच्या तुलनेत स्वस्त आहे. तसेच कुठल्याही खतापेक्षा पटकन परिणाम देणारेखत आहे. त्यामुळे शेतकरी बंधू युरियाच्या वापराला अधिक पसंती देतात. जर आपण खतांचा विचार केला तर नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरिया चा वापर सर्वाधिक केला जातो.
युरिया मध्ये 46 टक्के नत्र अमाईड नत्र असते. युरिया हा पाण्यात पूर्णपणे विरघळणारा असतो. युरियाचे रासायनिक संरचना पाहिली तर युरिया मध्ये 20.6 टक्के ऑक्सिजन, 20 टक्के कार्बन,सात टक्के हायड्रोजन आणि एक ते दीड टक्के बाय युरेट असते. या लेखात आपण युरियाचे अतिवापराचे परिणाम जाणून घेणार आहोत.
हे आहेत युरियाच्या अतिवापराचे परिणाम
- पिकांमध्येनत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. त्यामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे उत्पादनात घट येते. युरियाच्या अतिवापराने पिकांमध्ये लुसलुशीत पणा राहून खोड नाजुक राहते. त्यामुळे पीक जमिनीवर लोळतेतसेच पिकाचा कालावधी वाढतो.
- युरिया चा अति वापर केल्याने त्याचा परिणाम हा जमिनीच्या आरोग्यावर होतो.जमिनीतील कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊनसूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.तसेच पालाश, कॅल्शियम,बोरॉनआणि तांबे या अन्नद्रव्याची कमतरता भासते.
- युरियाचा अति वापर केल्याने जमिनी मध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रो बेक्टर सारख्या जीवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. तसेच जमिनीत असलेल्या गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. त्याचा सरळ परिणाम हा पीक वाढीवर होतो.
- महत्त्वाचे म्हणजे युरिया खताच्या जास्त वापरामुळे जमिनीतील पाण्याच्या प्रतीवर देखील परिणाम होतो. पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते. पाण्यातील शेवाळ आणि पान वनस्पतींची वाढ होते.
- युरियाच्या अतिवापरामुळे हवेचे प्रदूषण होते. कारण युरिया तील अमाईड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट मध्ये होते. नायट्रस ऑक्साईड, नायट्रीक ऑक्साईड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवितात. या वायूंचा विचार केला तर हे वायू कार्बन डाय-ऑक्साइड पेक्षा तीनशे पटीने अधिक घातक आहेत.
विना नीम कोटेड युरिया वापरल्या चे होणारे परिणाम
- युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होतास लगेच विरघळतो. त्याची नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तात्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो
- युरिया वाहून गेल्याने जमिनीतील पाणी प्रदूषित होते. या संपूर्ण प्रक्रियेत द्वारे नायट्रस ऑक्साईड नावाचा ग्रीन हाउस वायू तयार होतो.त्यामुळे हवा दूषित होते.
Share your comments