1. कृषीपीडिया

Organic Fertilizer: ताग गाडा जमिनीत, मिळवा हेक्टरी 125 ते 135 किलो नत्र,वाचा ताग जमिनीत गाडल्याचे फायदे

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत, लेंडीखत किंवा पाचट कंपोस्ट इत्यादींचा वापर करतो. परंतु या सर्व अत्यावश्यक गोष्टींमध्ये पोषक अन्नद्रव्ये याने समृद्ध असलेले ताग हे हिरवळीच्या खतासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम राहण्यास मदत होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jute crop

jute crop

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत, लेंडीखत किंवा पाचट कंपोस्ट इत्यादींचा वापर करतो. परंतु या सर्व अत्यावश्यक गोष्टींमध्ये पोषक अन्नद्रव्ये याने समृद्ध असलेले ताग हे हिरवळीच्या खतासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम राहण्यास मदत होते.

ताग जमिनीत गाडल्यानंतर त्यापासून हेक्‍टरी 125 ते 150 किलो नत्राची मात्रा मिळते. विशेष करून उत्पादन वाढीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढीसाठी ताग खूप उपयुक्त ठरतो. या लेखात आपण ताग जमिनीत गाडल्याचे फायदे जाणून घेऊ.

नक्की वाचा:सेंद्रिय पद्धतीने ताकापासुन बुरशी नाशक किटक नाशक बनविणे

ताग जमिनीत गाडल्याने मिळतात फायदेच फायदे

1- ताग पिकाच्या मुळांवर गाठी असतात, त्या गाठी मध्ये रायझोबियम जिवाणू  हवेतील नायट्रोजन शोषून घेतात. त्यामुळे त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या पिकाला  जिवाणू नत्र हे नायट्रेट आणि अमोनिअम अशा अवस्थेत उपलब्ध होते. पिकांना आणि विशेष करून उसाला सुरुवातीच्या वाढीसाठी  नायट्रेट नायट्रोजनचेचा वापर करता येतो.

2- ताग पिकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की, ते जमिनीतील अगदी खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषून घेते. जेव्हा आपण ताग जमिनीत गाडतो तेव्हा वरच्या थरात  अन्नद्रव्ये मिसळली जातात  व पिकाला उपलब्ध होतात.

नक्की वाचा:Crop choice:'या' पिकाची लागवड केल्यास पैसा तर येईल भरपूर परंतु जनावरांना देखील मिळेल पौष्टिक चारा, वाचा माहिती

3- पिके घेण्यापूर्वी तागाचे पीक जमिनीत गाडल्याने पिकांना रासायनिक खतांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. सेंद्रिय पदार्थांमुळे सूक्ष्म जिवाणू,

गांडूळ खत तसेच विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढते व त्यामुळे पिकांची वाढ जोमात होते. त्यासोबतच नत्रयुक्त खतांचे स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने  पाण्याच्या निचऱ्याद्वारे त्यांचा ऱ्हास होण्याचे प्रमाण हे कमीत कमी होते.

4- हिरवळीच्या खतासाठी जर ताग जमिनीत गाडला तर जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ आणि पिकांना लागणारे जे अत्यावश्यक अन्न घटक आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण व सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.

नक्की वाचा:Marigold Farming: झेंडूची लागवड करायची असेल तर वाचा झेंडूच्या जातींविषयी सविस्तर तपशीलवार माहिती, होईल फायदा

English Summary: digging jute crop is mine of important ingredients that so benificial for crop Published on: 22 July 2022, 10:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters