पिकांच्या पोषक वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी मुख्य अन्नद्रव्य आणि त्यासोबतच दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. परंतु हल्लीच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर हा अनाठाई होत असल्याने जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. जमिनी दिवसेंदिवस नापीक होत आहेत हो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा असेल तर तो आहे युरियाचा आहे.या लेखात आपणमुख्य अन्नद्रव्य व काही दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता व अतिरेक यांचा होणारा पिकांवर परिणाम याबद्दल माहिती घेणार आहोत.
मुख्य अन्नद्रव्य
- नत्र– नत्र हा पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पोषक घटक आहे. यामुळे पिकाच्या पानांचा रंग हा गडद हिरवा असतो. तसेच नत्रामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची वाढ देखील होते व शेती मालातील प्रथिनांचे प्रमाण देखील वाढते.
नत्राच्या कमतरतेची लक्षणे
पिकांमध्ये जर नत्राची कमतरता असेल तर सुरुवातीला पिकांची पक्व पाणी पिवळी पडतात व हळूहळू नवीन कोवळ्या पानांवर देखील पिवळा रंग दिसू लागतो. कालांतराने पिकाचे पाणी पूर्ण पिवळी पडून प्रकाशसंश्लेषण न झाल्यामुळे झाड हळूहळू वाळत जाते. किंवा झाडाला फांद्या, फुले व फळे फार कमी प्रमाणात लागतात व उत्पन्नात घट होते.
नत्राच्या जास्त वापराची लक्षणे
नत्र खतांचा जर जास्त प्रमाणात वापर केला तर पाने जळणे किंवा गळणे असे प्रकार दिसतात. तसेच झाडाला फुले फळे लग्नाचा उशीर होतो त्यामुळे पिके शेतात जास्त दिवस राहते. याचा थेट परिणाम आर्थिक उत्पन्नात होतो.
- स्फुरद–स्फुरद झाडांची मुळे वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच पिकांची पाणी कमतरता च्या वेळी तग धरण्याची क्षमता वाढते. पिकाला फुले,फळे लागणे तसेच फळे पिकविण्यासाठी स्फूरद कामी येते.
स्फुरदच्या कमतरतेची लक्षणे
झाडाची वाढ खुंटली जाते व पानांच्या कडा जांभळट करड्या रंगाच्या होतात.
स्फूरदच्या जास्त वापरायची लक्षणे
स्फूरदचाअतिरेकी वापर झाला तर तांबे आणि लोह यांना त्यांचे कार्य करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
- पालाश- पालाश झाडामध्ये वाहक म्हणून कार्य करते. झाडामधील साखर व झाडाच्या अन्न इत्यादी वनस्पतीच्या इतर भागांमध्ये पोचवण्यासाठी मदत करते. तसेच थंडी, रोग इत्यादींपासून झाडाला स्वतःचा बचाव करता यावा म्हणून झाडांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करते. तसेच वनस्पतीच्या फांद्या मजबूत बनवते जेणेकरून अधिक फळधारणा झाल्यावर फांद्या मोडत नाहीत.
पालाशच्या कमतरतेची लक्षणे
पालाशची कमतरता ही वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगळ्या प्रकारची लक्षणे दाखवते. याच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा करड्या रंगाच्या होतात व वाळतात. लक्षणे आधी खालच्या पानांवर आढळतात नंतर अधिक प्रमाणात कमतरता असेल तर नवीन येणाऱ्या पानांवर देखील आढळतात.
कपाशीमध्ये मुख्यतः पालाशच्या कमतरतेमुळे ही लक्षणे अगदी सुरुवातीच्या काळात देखील नवीन पालवीवर आढळतात. तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये पिकांची कांडी दुबळी होते. थोडा जरी वारा आला तरी सहज मोडली जाते व पीक कोलमडते.
पालाशच्या अधिक वापरामुळे होणारे परिणाम
जास्त प्रमाणात पालाश या खताचा वापर केल्याने मॅग्नेशियम, जिंक, लोह आणि मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांच्या शोषणात झाडाला अडचण निर्माण होते.
पुढील लेखामध्ये आपण दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वअतिरेकी वापरामुळे पिकांवर होणारे परिणाम पाहू.
Share your comments