त्यांच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या रासायनिक मूलद्रव्यांना आवश्यक अन्नद्रव्य असे म्हणतात. त्यांचा पुरवठा जर वेळीच आणि योग्य प्रमाणात झाला नाही तर पिकांवर त्यांचा परिणाम होतो. अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर त्याची लक्षणे हे पिकाच्या जुन्या आणि नवीन पानावर दिसतात.
पिकाची पाने पिवळी पडतात तसेच तपकिरी करडे डाग पडतात. पानांचा आकार लहान होतो तसेच त्यांची वाढ खुंटते.या लेखात आपण पिकांमधील अन्नद्रव्याची कमतरता व त्यावरील उपाय योजना जाणून घेणार आहोत.
पिकांसाठी उपयुक्त अन्नद्रव्य
पिकांना नत्र,स्फुरदआणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत पिकांना कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक हे दुय्यम आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून16 अन्नद्रव्यांची गरज असते. त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांची एकूण गरज कमी जास्त असते. यासाठी विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या ग्रेड्सबाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ 19:19:19,12:61:00,00:52:34,13:00:45 इत्यादी. हे सर्व खते पाण्यात संपूर्णपणे विरघळतात. हे पिकांना ठिबक द्वारे अथवा फवारणीद्वारे देखील देता येतात.
तीव्रता
- खताची तीव्रता पिकांमध्ये असलेल्या कमतरतेच्या प्रमाणानुसार ठरवावे. त्यासाठी माती किंवा देठ परीक्षण अहवालाची मदत घ्यावी
- विद्राव्य खतांची तीव्रताही पाण्यामध्ये विरघळून देतांना महत्त्वाचे असते. सर्वसामान्यपणे सुरवातीच्या वाढीच्या काळात अर्धा टक्का, फुलोरा येण्यापूर्वी एक टक्का व फुलोरा आल्यानंतर दोन टक्के तीव्रतेचे द्रावण एकरी 200 लिटर प्रमाणे पिकावर फवारावे. ( एक टक्का म्हणजे एक किलो खत प्रति 100 लिटर पाणी )
- पिकांमध्ये स्वच्छता, कोळपणी किंवा खुरपणी केल्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या खतांचा वापर करावा. त्यासाठी सुरुवातीस 19:19:19 तुझ्या देखत एक टक्का, फुलोरा पूर्वी 12:61:00 किंवा 0:52:34हे खत एक टक्का आणि फुलोरे यानंतर 13:00:45 किंवा 00:00:50 फवारणीद्वारे दोन टक्के या प्रमाणात वापरावे. पिकांची जोमदार वाढ होते.
अन्नद्रव्यांचे फायदे
- पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्य मिळाल्यानंतर त्यांची रोग, कीड व पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
- फूल व फळगळ थांबून फळधारणा चांगली होते. फळांची संख्या, वजन, आकार व प्रत यात लक्षणीय वाढ होते.
- लक्षणानुसार पिकात अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास आपत्कालीन उपाय म्हणून फवारणीद्वारे त्यांची पूर्तता करावी.
- विद्राव्य खतांमध्ये फक्त यू याचा विचार न करता दोन व तीन अन्नघटक असलेली व चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये सारखी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर करावा.
- विद्राव्य खते प्रमाणात (0.5 ते एक टक्का) पाण्यात मिसळून स्वच्छ पंपाद्वारे फवारणी सकाळी अकरा पर्यंत व संध्याकाळी चार वाजे नंतर फवारणी केल्यास जास्त उपयोगी ठरते. द्रावणामध्ये स्टिकर एक मिली प्रति लिटर प्रमाणे फवारावे.
- पीक वाढीच्या अवस्था व फवारणी द्रावणाची तीव्रता विचारात घेऊनच पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
( संदर्भ- ॲग्रोवन )
Share your comments